Sher Shivraj : 'शेर शिवराज' प्राइम टाईमला दाखवावा; प्रेक्षकांची मागणी
Sher Shivraj : 'शेर शिवराज' हा सिनेमा प्राइम टाईमला दाखवावा, अशी मागणी प्रेक्षक सध्या करत आहेत.
Sher Shivraj : दिग्पाल लांजेकरांचा (Digpal Lanjekar) 'शेर शिवराज' (Sher Shivraj) हा सिनेमा 22 एप्रिलला सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाच्या माध्यमातून अफजलखानाच्या वधाचा थरार प्रेक्षकांना अनुभवता येत आहे. दरम्यान हा सिनेमा प्राइम टाईमला दाखवावा, यासाठी प्रेक्षक मागणी करत आहेत.
अंधेरी स्टेशन पूर्व पश्चिम दोन्ही बाजूंना 'शेर शिवराज' चे पोस्टर हातात घेऊन प्रेक्षकच प्राइम टाईम ची मागणी करत आहेत. महाराष्ट्रात राहुन छत्रपतींच्या पराक्रमावर आधारीत सिनेमाला प्रेक्षकांची मागणी असून प्राइम टाईमला शोज का मिळत नाहीत, असा प्रश्न प्रेक्षक उपस्थित करत आहेत.
View this post on Instagram
'शेर शिवराज' हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर अभिनेता अक्षय वाघमारेने सोशल मीडियावर एक जळजळीत पोस्ट शेअर केली होती. 'महाराष्ट्रात राहून आपल्या मातृभाषेच्या चित्रपटासाठी झगडावे लागत आहे यासारखे दुसरे दुर्दैव नाही, अशा संदर्भातील पोस्ट शेअर करत त्याने निषेध व्यक्त केला होता. अशातच मराठी सिनेमाला प्राईम टाईम मिळायला हवा, असे मत अभिनेता श्रेयस तळपदेने एबीपी माझाच्या 'महा कट्ट्या'वर मांडले.
मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, ओरंगाबाद, कोल्हापूर यांसह विविध शहरांतून तसेच परदेशांतून सगळ्याच वयोगटांतील प्रेक्षकांनी 'शेर शिवराज' सिनेमाचे जोरदार स्वागत केले आहे. 'शेर शिवराज' सिनेमात चिन्मय मांडलेकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसत आहेत. तर अफजलखानाच्या भूमिकेत मुकेश ऋषी दिसत आहेत.
संबंधित बातम्या