एक्स्प्लोर

Rakesh Maria Biopic : माजी पोलीस आयुक्त राकेश मारियांचा बायोपिक येणार! रोहित शेट्टी करणार दिग्दर्शन

Rakesh Maria Biopic : हा बायोपिक राकेश मारिया यांच्या यशस्वी कारकिर्दीतील अनुभवांवर आधारित असेल आणि स्वत: रोहित शेट्टी या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे.

Rakesh Maria Biopic : ‘सिंघम’, ‘सिम्बा’, ‘सूर्यवंशी’सारख्या ‘कॉप’ चित्रपट तयार करणारा बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) आता खऱ्याखुऱ्या पोलीस अधिकाऱ्याच्या आयुष्यावर आधारित चित्रपट बनवणार आहे. रोहित शेट्टी याने नुकतीच त्याच्या आगामी नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया (Rakesh Maria) यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिकचे दिग्दर्शन रोहित शेट्टी करणार आहे. रोहित शेट्टी आणि रिलायन्स एंटरटेनमेंटने (Reliance Entertainment) या चित्रपटासाठी हातमिळवणी केली आहे.

हा आगामी बायोपिक राकेश मारिया यांच्या यशस्वी कारकिर्दीतील अनुभवांवर आधारित असेल आणि स्वत: रोहित शेट्टी या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे.

 

Rakesh Maria Biopic : माजी पोलीस आयुक्त राकेश मारियांचा बायोपिक येणार! रोहित शेट्टी करणार दिग्दर्शन

अभिमान वाटतो!

नव्या चित्रपटाची घोषणा करताना, निर्माता आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी म्हणाला की, ‘राकेश मारिया, असा माणूस ज्याने 36 वर्षे या गुन्हेगारी विश्वाचा सामना केला. 1993चा मुंबईतील बॉम्बस्फोट, अंडरवर्ल्ड धोक्यापासून ते 2008मध्ये 26/11च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यापर्यंतचा त्यांचा हा प्रवास अविश्वसनीय आहे. या खऱ्याखुऱ्या आयुष्यातील सुपर कॉपच्या धाडसी आणि निर्भय प्रवासाला पडद्यावर साकारताना खरोखरच अभिमान वाटतो आहे.’

कोण आहेत राकेश मारिया?

आयपीएस अधिकारी राकेश मारिया यांनी 1981च्या बॅचमधून सिव्हिल सर्व्हिस परीक्षा उत्तीर्ण केली. 1993 मध्ये पोलिस उपायुक्त (वाहतूक) म्हणून, त्यांनी मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाचा छडा लावला आणि नंतर ते मुंबई पोलिसांचे DCP (गुन्हे शाखा) आणि नंतर सह पोलिस आयुक्त (गुन्हे शाखा) झाले. राकेश मारिया यांनी 2003मधील गेटवे ऑफ इंडिया आणि झवेरी बाजार या दुहेरी बॉम्बस्फोट प्रकरणाचीही उकल केली. 2008मध्ये 26/11च्या मुंबई हल्ल्याच्या तपासाची जबाबदारीही मारिया यांना देण्यात आली होती. त्यांनी जिवंत पकडलेला एकमेव दहशतवादी अजमल कसाब याची चौकशी केली आणि या प्रकरणाचा तपास यशस्वी झाला.

ही एक मौल्यवान संधी!

राकेश मारिया यांनी या चित्रपटाविषयी बोलताना म्हटले की, ‘हा प्रवास पुन्हा एकदा जगायला मिळणं रोमांचकारी असणार आहे. विशेषत: रोहित शेट्टी सारख्या प्रतिभाशाली दिग्दर्शकाने हा चित्रपट हाती घेणं कौतुकाचं आहे. नॉस्टॅल्जियापेक्षा, खडतर आव्हानांना आणि सर्व अडचणींना तोंड देणाऱ्या मुंबई पोलिसांचे असामान्य कार्य लोकांसमोर मांडण्याची ही एक मौल्यवान संधी असणार आहे.’

हेही वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhandara News : साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
Nagpur Accident : रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
Putin Nuclear attack Warning: युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
Mumbai Rains: मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

सकाळी ९ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 9AM 26 September 2024Amit Shah On Vidhan Sabha : अमित शाहांचा भाजप पदाधिकाऱ्यांना जिंकण्याचा कानमंत्र #abpमाझाNarendra Modi Pune Daura : मोदींच्या पुणे दौऱ्यावर पावसाचं सावट कायम, सभास्थळी चिखलाचं साम्राज्यमाझं गाव, माझा जिल्हा Majha Gaon Majha Jilha 730 AM Superfast 26 Sept 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhandara News : साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
Nagpur Accident : रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
Putin Nuclear attack Warning: युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
Mumbai Rains: मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
PM Modi in Pune: पुण्यातला पाऊस पंतप्रधान मोदींच्या सभेचा विचका करणार? एसपी कॉलेजमध्ये चिखल झाला तर सभा कुठे होणार, आयोजकांकडून तयारीला सुरुवात
पुण्यातला पाऊस पंतप्रधान मोदींच्या सभेचा विचका करणार? पर्यायी चाचपणी सुरु, आयोजक तयारीला लागले
Navratri 2024 : नवीन महिन्यासोबतच शारदीय नवरात्रीला सुरुवात; नवरात्रीचे 9 दिवस 'या' 3 राशींसाठी भाग्याचे, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
नवीन महिन्यासोबतच शारदीय नवरात्रीला सुरुवात; नवरात्रीचे 9 दिवस 'या' 3 राशींसाठी भाग्याचे, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Bengaluru Crime : बंगळुरुत महालक्ष्मीचे 59 तुकडे करुन पळाला, आता मुख्य आरोपीचा मृतदेह ओडिशात सापडला, सस्पेन्स वाढला
बंगळुरुतील महालक्ष्मी खून प्रकरणाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह आढळला, सस्पेन्स वाढला
Mumbai Rain : मुसळधार पावसानं झोडपलं, 250 मिमीहून अधिक पाऊस पडला, लोकल खोळंबली, विमानं वळवली अन् रस्त्यावर वाहतूक कोंडी,मुंबईकरांचे प्रचंड हाल
मुंबईला पावसानं झोडपलं, पाणी साचलं, वाहतूक कोंडी अन् लोकल खोळंबल्यानं मुंबईकरांचे प्रचंड हाल
Embed widget