Shamshera: 'शुद्ध सिंह'; 'शमशेरा'मधील संजय दत्तचा दमदार लूक पाहिलात का?
Shamshera : नुकताच या चित्रपटामधील संजय दत्तचा लूक रिव्हिल करण्यात आला आहे.
Shamshera : अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor), अभिनेत्री वाणी कपूर (Vaani Kapoor) आणि संजय दत्त (Sanjay Dutt) अशी तगडी स्टार कास्ट असणारा 'शमशेरा' (Shamshera) चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काल (21 जून) या चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा टीझर रिलीज झाला आहे. 'शमशेरा' चित्रपटाचा ट्रेलर 24 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटामधील संजय दत्तचा लूक रिव्हिल करण्यात आला आहे.
वाणी कपूरनं सोशल मीडियावर संजय दत्तचा लूक शेअर केला आहे. हातात हंटर, कपाळावर टिळा असा लूक संजय दत्तचा दिसत आहे. वाणीनं संजयचा हा लूक शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'निर्दयी' या शब्दाचा दुसरा अर्थ पोलीस शुद्ध सिंह आहे.' संजय हा शुद्ध सिंह या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका या चित्रपटात साकारणार आहे. वाणी ही एका डान्सरची भूमिका या चित्रपटात साकारणार असून रणबीर हा या चित्रपटात डबल रोल असणार आहे.
View this post on Instagram
एका मुलाखतीमध्ये संजय दत्तनं त्याच्या या भूमिकेबाबत सांगितलं,'शुद्ध सिंग हे एक पात्र आहे जे तुम्ही पडद्यावर पाहिले नसेल. तो फक्त खलनायक आहे. तो धमकावणारा आहे, तो अविश्वासू आहे आणि तो विनाश घडवण्यासाठी काहीही करु शकतो. मी भूमिका साकारावी असं करण मल्होत्राला वाटले. त्यांनी मला शुद्ध सिंहला साकारण्याची संधी दिली. मला आशा आहे की लोकांना माझा हा प्रयत्न आवडेल.'
चित्रपटामधील भूमिकेसाठी वाणी कपूरनं कथ्थक नृत्याचे ट्रेनिंग घेतले. हा चित्रपट हिंदी बरोबरच तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये देखील रिलीज होणार आहे. 'शमशेरा' चित्रपटाची निर्मिती आदित्य चोप्रानं केली आहे. 22 जुलै रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट 18 मार्च 2022 रोजी प्रदर्शित होणार होता. परंतु, कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव पाहता पुन्हा एकदा त्याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. रणबीर, संजय आणि वाणीचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहात आहे. शमशेरासोबतच रणबीरचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये रणबीरसोबत आलिया भट प्रमुख भूमिका साकारणार आहे.
हेही वाचा:
- Shamshera Teaser: अंगावर शहारे आणणारा 'शमशेरा'चा टीझर रिलीज; संजय दत्त अन् रणबीर कपूरच्या लूकनं वेधलं लक्ष
- Shamshera Poster : 'शमशेरा' सिनेमातील रणबीर कपूरचा लूक आऊट; आलियाने शेअर केलं पोस्टर