(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shamshera Poster : 'शमशेरा' सिनेमातील रणबीर कपूरचा लूक आऊट; आलियाने शेअर केलं पोस्टर
Ranbir Kapoor Shamshera Movie : 'शमशेरा' सिनेमातील रणबीर कपूरचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
Ranbir Kapoor Shamshera First Look Poster : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या 'शमशेरा' (Shamshera) सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात संजय दत्त (Sanjay Dutt) आणि वाणी कपूरदेखील (Vaani Kapoor) दिसणार आहे. नुकताच 'शमशेरा' सिनेमातील रणबीरचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आलिया भट्टनेदेखील सोशल मीडियावर रणबीरचा लूक शेअर केला आहे.
आलिया भट्टला रणबीरचा 'शमशेरा' सिनेमातील लूक आवडला आहे. त्यामुळेच तिने सोशल मीडियावर रणबीरचा लूक शेअर केला आहे. आलियाने पोस्टर शेअर करत लिहिले आहे,"शुभ सकाळ". आलियाने शेअर केलेल्या रणबीरचा लूक खूपच हटके आहे. वाढलेले केस आणि दाढी, तसेच हातात हत्यार असा काहीसा रणबीरचा फर्स्ट लूक आहे.
ट्रेलर लवकरच होणार आऊट
अॅक्शनचा तडका असणाऱ्या 'शमशेरा' सिनेमाची प्रेक्षक प्रतीक्षा करत आहेत. काही दिवसांपूर्वी टीझर आऊट झाला होता. टीझरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. 'शमशेरा' सिनेमात रणबीर कपूर व्यतिरिक्त संजय दत्त आणि वाणी कपूरदेखील दिसून येणार आहेत. या बहुचर्चित सिनेमाचा ट्रेलर 24 जूनला आऊट होणार आहे. तर 22 जूनला सिनेमा प्रदर्शित होणार आहे. यशराज फिल्म्सच्या बॅनरअंतर्गत या सिनेमाची निर्मिती करण्यात येणार आहे.
View this post on Instagram
'शमशेरा'चे पोस्टर लीक
सोशल मीडियावर रणबीरचा लूक व्हायरल झाला होता. रणबीर कपूरच्या 'शमशेरा'चे पोस्टर लीक झाल्यामुळे प्रेक्षक सिनेमाची प्रतीक्षा करत होते. अशातच आज अधिकृतरित्या रणबीरचा 'शमशेरा' सिनेमातील फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. आता प्रेक्षक ट्रेलरची वाट पाहत आहेत.
रणबीरचे आगामी सिनेमे
'शमशेरा' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानंतर रणबीर कपूर त्याच्या आगामी ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमाच्या प्रमोशनला सुरुवात करणार आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित या सिनेमात रणबीर आलिया भट्टसोबत दिसणार आहे. लव रंजन या सिनेमाची निर्मिती करत आहेत. त्यानंतर रणबीर संदीप रेड्डी वांगाच्या आगामी 'अॅनीमल' या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.
संबंधित बातम्या