Shah Rukh Khan: 'तोंड का लपवत आहे?'; शाहरुख खान ट्रोलर्सच्या निशाण्यावर
वैष्णोदेवीचे दर्शन घेतल्यानंतर शाहरुख (Shah Rukh Khan) मुंबईमध्ये परत आला आहे. त्याचा एअरपोर्टवरील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Shah Rukh Khan: बॉलिवूडचा (Bollywood) बादशाह अशी ओळख असणारा प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) चाहता वर्ग मोठा आहे. शाहरुखच्या व्हायरल फोटो आणि व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळते. शाहरुखच्या पठाण (Pathaan) चित्रपटाची शाहरुखचे चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत. हा चित्रपट रिलीज होण्याआधी शाहरुखनं वैष्णोदेवीचे दर्शन घेतले आहे. जम्मू- काश्मिरमधील वैष्णोदेवीच्या (Vaishno Devi) मंदिराच्या आवारातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता वैष्णोदेवीचे दर्शन घेतल्यानंतर शाहरुख मुंबईमध्ये परत आला आहे. त्याचा एअरपोर्टवरील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स करुन शाहरुखला ट्रोल केलं आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये शाहरुख हा चेहऱ्यावर ब्लॅक मास्क, ब्लू शर्ट आणि ब्लॅक पँट अशा लूकमध्ये दिसत आहे. व्हिडीओमध्ये शाहरुखचा चेहरा दिसत नाही. त्यामुळे सध्या काही नेटकरी त्याला ट्रोल करत आहेत.
नेटकऱ्यांच्या कमेंट्स
एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'शाहरुख हा राज कुंद्रासारखं तोंड लपवत आहे.' तर दुसऱ्यानं कमेंटमध्ये लिहिलं, 'शाहरुख तोंड का लपवत आहे?' 'को तोंड का लपवत आहे? तो शाहरुख आहे की त्याचा बॉडी डबल? उमराह केल्यानंतर त्यानं असं केलं नव्हतं. मग वष्णोदेवीचं दर्शन घेऊन आल्यावर का असं करत आहेत? पठाण रिलीज होणार आहे म्हणून तो पब्लिसिटी स्टंट करत आहे का? ' अशी कमेंट एका नेटकऱ्यानं केली.
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
पठाण हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटातील 'बेशरम रंग' हे गाणं काल रिलीज झालं आहे. या चित्रपटात शाहरुखसोबतच दीपिका पादुकोण देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. 'बेशरम रंग' गाण्यातील शाहरुख आणि दीपिकाच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Shah Rukh Khan: शाहरुख खान वैष्णोदेवीच्या चरणी नतमस्तक; मंदिराच्या आवारातील व्हिडीओ व्हायरल