एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

'ठाकरे' स्क्रीनिंगला मानापमान नाट्य, संजय राऊत यांची सारवासारव

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित 'ठाकरे' सिनेमाचं स्क्रीनिंग त्यांच्या जयंतीला म्हणजेच 23 जानेवारीला करण्यात आलं.

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट असलेल्या 'ठाकरे' चित्रपटाच्या स्क्रीनिंगदरम्यान झालेल्या मानापमान नाट्यावर खासदार संजय राऊत यांनी सारवासारव केली आहे. "अभिजीत पानसे यांना काही काम होतं आणि या कार्यक्रमात सगळेच ये-जा करत असतात," अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. चित्रपटाचे दिग्दर्शक आणि मनसे नेते अभिजीत पानसे बसण्यासाठी योग्य सीट न मिळाल्याने स्क्रीनिंग अर्धवट सोडून निघून गेले. काय आहे संपूर्ण प्रकार? शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित 'ठाकरे' सिनेमाचं स्क्रीनिंग त्यांच्या जयंतीला म्हणजेच 23 जानेवारीला करण्यात आलं. मुंबईतील वरळी आयनॉक्समध्ये काल संध्याकाळी साडेसात वाजता ठाकरे सिनेमाचं स्क्रीनिंग आयोजित करण्यात आलं होतं. स्क्रीनिंगला पोहोचायला अभिजीत पानसे यांना उशीर झाला. मात्र दिग्दर्शक असूनही अभिजीत पानसे आणि त्यांच्या कुटुंबीयांना बसायला नीट जागा देण्यात आली नाही. निर्माते आणि प्रिमियरच्या आयोजकांनी दिलेल्या वागणुकीमुळे पानसे काहीसे नाराज झाल्याची माहिती आहे. नाराज झालेल्या अभिजीत पानसे यांनी स्क्रीनिंग सुरु असतानाच काढता पाय घेतला. यावेळी थिएटरबाहेर पानसे आणि संजय राऊत यांच्यात शाब्दिक चकमक उडाल्याचीही माहिती आहे. ठाकरे चित्रपटाच्या प्रमोशनमधून डावलल्याची खदखद अभिजीत पानसेंच्या मनात आधीपासूनच होती. 'ठाकरे'च्या स्क्रीनिंगला संजय राऊत-अभिजीत पानसेंमध्ये खडाजंगी थिएटरमध्ये आपल्याला पहिल्या रांगेत जागा दिल्याचा दावा अभिजीत पानसेंनी केला. तर मान्यवर आणि विशेष निमंत्रितांची विशेष आसनव्यवस्था करण्यात आली होती. पानसे उशिरा आल्यामुळे तोपर्यंत सीट्स उरल्या नव्हत्या, असं निर्मात्यांचं म्हणणं आहे. अमेय खोपकरांचा शिवसेनेवर निशाणा दरम्यान, या संपूर्ण प्रकारानंतर मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. "अभिजित हे असं वागणं हीच त्यांची संस्कृती आहे पण महाराष्ट्रातील तमाम रसिक प्रेक्षक हे तुझ्या पाठीशी आहेत," असं ट्वीट त्यांनी केलं आहे. शिवाय या हॅशटॅगद्वारे अभिजीत पानसेंचा पाठिंबा दिला जात आहे. मनसेच्या ठाकरे चित्रपटाला शुभेच्छा, पण... 'मनसे नेते अभिजीत पानसे यांनी दिग्दर्शित केलेल्या ठाकरे चित्रपटाला शुभेच्छा,' असा मजकूर असलेलं पोस्टर मनसेतर्फे लावण्यात आलं होतं. नवाझुद्दीन सिद्दीकी या सिनेमात बाळासाहेबांची व्यक्तिरेखा साकारत असून अभिनेत्री अमृता राव माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. येत्या 25 जानेवारीला मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

संबंधित बातम्या

बाळासाहेब ठाकरे 'अॅक्सिडेंटल शिवसेनाप्रमुख' नव्हते : संजय राऊत नवाजुद्दीन सिद्दीकी आणि संजय राऊत 'माझा' कट्ट्यावर ठाकरे सिनेमातील 'आया रे सबका बापरे...' गाणं प्रदर्शित

सत्तर रुपयांचा 'शिववडा' खात थिएटरमध्ये 'ठाकरे' पाहा!

'ठाकरे' साठी दोन हिंदी चित्रपटांच्या तारखा पुढे ढकलल्या!

'ठाकरे' सिनेमातील संवादावर अभिनेता सिद्धार्थचा आक्षेप

'ठाकरे' व्यतिरिक्त कोणताही सिनेमा रिलीज होऊ देणार नाही : बाळा लोकरे

बायोपिकच्या सिक्वलचाही विचार, 'ठाकरे' च्या ट्रेलर लॉन्चिंगला दिग्गजांची उपस्थिती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
अशा निवडणुका पाकिस्तानातही होत नाहीत, निवडणूक आयोग जिवंत आहे का; संजय राऊतांकडून व्हिडिओ शेअर
अशा निवडणुका पाकिस्तानातही होत नाहीत, निवडणूक आयोग जिवंत आहे का; संजय राऊतांकडून व्हिडिओ शेअर
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी;  शेजारील कुटुंब भयभीत
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी; शेजारील कुटुंब भयभीत
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7 PM 26 November 2024Pan 2.0 : केंद्र सरकारकडून पॅन 2.0 या योजनेला मंजुरी, पॅन कार्डमध्ये बदल होणारEknath shinde On CM : शिंदे फडणीसांपासून लांब,  मुख्यमंत्रिपदावरुन एकनाथ शिंदे नाराज?ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6 PM 26 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
अशा निवडणुका पाकिस्तानातही होत नाहीत, निवडणूक आयोग जिवंत आहे का; संजय राऊतांकडून व्हिडिओ शेअर
अशा निवडणुका पाकिस्तानातही होत नाहीत, निवडणूक आयोग जिवंत आहे का; संजय राऊतांकडून व्हिडिओ शेअर
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी;  शेजारील कुटुंब भयभीत
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी; शेजारील कुटुंब भयभीत
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Udayanraje: उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
Embed widget