एक्स्प्लोर
First Look : 'पानीपत'मध्ये संजय-अर्जुन आमने-सामने; क्रिती साकारणार पार्वतीबाई
Panipat First Look : आगामी 'पानीपत' चित्रपटातील प्रमुख पात्रांचे फर्स्ट लूकचे पोस्टर्स रिलीज करण्यात आले आहेत. या पोस्टर्सने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय.
मुंबई - बहुप्रतिक्षीत 'पानीपत' या चित्रपटातील प्रमुख पात्रांचे फर्स्ट लूक प्रदर्शित झाले आहेत. यात बॉलिवुड अभिनेता अर्जून कपूर, संजय दत्त आणि क्रिती सेनेन यांचा समावेश आहे. फर्स्ट लूकमध्ये संजय दत्त आणि अर्जून कपूर योद्ध्याच्या रुपात दिसतायेत. तर क्रिती सेनन हिनं मराठमोळं पात्र साकारलं आहे. या चित्रपटाचा ट्रेलर 5 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. याअगोदर निर्मात्यांनी आघाडीच्या 3 पात्रांची ओळख करुन दिलीये केलं आहे. सोशल मीडियावरही या पोस्टर्सवर चांगल्या प्रतिक्रिया उमटत आहे. त्यावरुन या तिघांचेही लूक्स प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस पडलेत.
पोस्टर्समध्ये संजय दत्त अहमद शाह अब्दालीच्या पात्रात उठून दिसतोय. यात त्याचा लूक खलनायकी दाखवण्यात आलाय. तो एका योद्ध्याच्या वेशभूषेत दिसत आहे. चित्रपटातील पात्रांसाठी सर्वांनीच खूप मेहनत घेतल्याचे दिसून येत आहे. अनेक दिवसांपासून प्रेक्षक चित्रपटातील पात्रं पाहण्यासाठी उत्सुक होते. क्रितीने चित्रपटासाठी हॉर्स राइडिंगचे खास प्रशिक्षण घेतलं आहे.
आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित 'पानीपत' 6 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पानीपतच्या तिसऱ्या लढाईवर हा चित्रपट बेतला आहे. ही लढाई 1761 मध्ये अब्दाली आणि मराठ्यांमध्ये झाली होती. संजय दत्तसोबतच अर्जून कपूरही यामध्ये मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
जबरदस्त अॅक्शन असलेल्या ह्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला 2018 च्या मध्यापासून सुरुवात झाली आहे. अर्जुन कपूर आणि संजय दत्त एकत्र काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे. सिनेमात अर्जुन मराठा योद्ध्याच्या भूमिकेत दिसणार आहे. तर संजय दत्तचीही महत्त्वाची भूमिका आहे.
संबंधीत बातम्या - मराठ्यांचा इतिहास मोठ्या पडद्यावर, 'पानिपत'चं पोस्टर रिलीज
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement