एक्स्प्लोर
'ए दिल है मुश्कील'विरोधात संभाजी ब्रिगेडची निदर्शने
मुंबई : मनसेचा विरोध मावळल्यानंतर करण जोहरचा 'ए दिल है मुश्कील' सिनेमा आज रिलीज झाला आहे. मात्र संभाजी ब्रिगेडने या सिनेमाला विरोध सुरु केल्याचं चित्र आहे. कल्याणच्या सर्वोदय मॉलमध्ये संभाजी ब्रिगेडने या सिनेमाच्या प्रदर्शनाला विरोध करत निदर्शनं केली.
उरी येथे झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ज्या सिनेमांमध्ये पाकिस्तानी कलाकार काम करत आहेत, त्या सिनेमांवर मनसेने बंदीची मागणी केली होती. अखेर काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक निर्माते करण जोहर यांच्या पुन्हा पाकिस्तानी कलाकारांना सिनेमामध्ये घेणार नाही, या आश्वासनानंतर आज हा सिनेमा रिलीज होत आहे.
दरम्यान, अजय देवगणचा शिवाय सिनेमाही आज रिलीज होतोय. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत बॉक्स ऑफिसवर नक्की कोण बाजी मारणार याकडे सिनेरसिकांचं लक्ष लागलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement