Salman Khan : '...म्हणून मी हे ब्रेसलेट घालतो'; सलमाननं सांगितली निळ्या रंगाचा स्टोन असलेल्या ब्रेसलेटची गोष्ट
सलमानच्या चाहत्यांना असा प्रश्न पडत असेल की, तो नेहमी हातात ब्रेसलेट का घालतो?

Why Salman Khan always wears Bracelet : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (salman khan) त्याच्या अभिनयाने आणि स्टाईलने नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. सलमानची चर्चा सोशल मीडियावर नेहमी होत असते. सलमानच्या चाहत्यांना असा प्रश्न पडत असेल की, तो नेहमी हातात ब्रेसलेट का घालतो? नुकताच सलमानचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये एका मुलीने सलमानला त्याच्या ब्रेसलेटबद्दल प्रश्न विचारलेला दिसत आहे. त्या मुलीला सलमानने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ एका इव्हेंटमधील आहे. इव्हेंटला आलेली एक मुलगी सलमानला प्रश्न विचारते की,'तु जे हे ब्रेटसेट घालतो त्यामागचे कारण काय आहे?', या प्रश्नावर सलमान उत्तर देतो, 'असे ब्रेसलेट माझे वडील घालत होते. त्यावेळी मी लहान होतो. मी अनेकवेळा त्यांच्या ब्रेसलेटसोबत खेळत बसत होतो. मला त्यांचे ब्रेसलेट खूप आवडत होते. जेव्हा मी अभिनय क्षेत्रात काम करायला सुरूवात केली. तेव्हा त्यांनी मला त्यांच्याकडे असलेल्या ब्रेसलेट सारखे दुसरे ब्रेसलेट आणून दिले. तेव्हा पासून मी हे ब्रेसलेट नेहमी हातात घालतो. या ब्रेसलेटच्या मधे असलेल्या स्टोनचे नाव फिरोजा असं आहे. जर कोणतीही निगेटिव्ह एनर्जी माझ्या आजूबाजूला आली तर हा स्टोन तुटतो. या आधी माझे 7 स्टोन तुटले. हा माझा 7 वा स्टोन आहे. '
View this post on Instagram
लवकरच सलमानचा टायगर -3 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच सलमानच्या दबंग, बजरंगी भाईजान,अंतिम-द फायनल ट्रुथ, मैने प्यार किया, एक था टायगर, टायगर जिंदा है या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
संबंधित बातम्या
AR Rahman Daughter Engagement : ए.आर.रेहमानच्या मुलीचा साखरपुडा संपन्न; कोण आहेत रेहमानचे जावई?
The Kapil Sharma Show : भारती, कृष्णा अन् अर्चना; कपिल शर्मा शोच्या कलाकारांचे मानधन माहितेय?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
