(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Salaar Teaser: प्रभासच्या सालारचा टीझर 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस; चित्रपटाच्या मेकर्सनं दिली माहिती
प्रभासचा सालार (Salaar) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
Salaar Teaser: अभिनेता प्रभासचा (Prabhas) आदिपुरुष हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटाचं काहींनी कौतुक केलं तर काही लोकांनी या चित्रपटावर टीका केली. आता प्रभासचा सालार (Salaar) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकतच चित्रपटाच्या मेकर्सनं या चित्रपटाचं एक जबरदस्त पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. हे पोस्टर शेअर करुन सालार या चित्रपटाच्या टीझरच्या रिलीज डेटबाबत माहिती दिली आहे.
सालार या चित्रपटाच्या मेकर्सनं या चित्रपटाचं एक ब्लँक अँड व्हाईट पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये प्रभासचा चेहरा दिसत नाही. या पोस्टरला कॅप्शन देण्यात आलं, सर्वात हिंसक व्यक्तीला भेटण्यासाठी तयार रहा, सालारचा टीझर 6 जुलै रोजी येणार प्रेक्षकांच्या भेटीस
सालार हा या चित्रपटात गँगस्टरची भूमिका साकारणार आहे, असं म्हटलं जात आहे. प्रभासच्या या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
सालार हा चित्रपट 250 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे, असं म्हटलं जात आहे. Hombale Films नं या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. श्रुती हसन ही देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहे. प्रभास आणि श्रुतीसोबतच या चित्रपटात, पृथ्वीराज सुकुमारन, जगपती बाबू, मधु गुरुस्वामी हे कलाकार देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत.
𝐁𝐫𝐚𝐜𝐞 𝐲𝐨𝐮𝐫𝐬𝐞𝐥𝐟 𝐟𝐨𝐫 𝐭𝐡𝐞 𝐦𝐨𝐬𝐭 𝐯𝐢𝐨𝐥𝐞𝐧𝐭 𝐦𝐚𝐧, #𝐒𝐀𝐋𝐀𝐀𝐑 🔥
— Hombale Films (@hombalefilms) July 3, 2023
Watch #SalaarTeaser on July 6th at 5:12 AM on https://t.co/QxtFZcNhrG #SalaarTeaserOnJuly6th#Prabhas #PrashanthNeel @PrithviOfficial @hombalefilms #VijayKiragandur @IamJagguBhai… pic.twitter.com/Vx1i5oPLFI
'सालार' हा चित्रपट 28 सप्टेंबर 2023 रोजी हिंदी, तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये रिलीज होणार आहे. हा चित्रपट IMAX 4K आवृत्तीमध्ये देखील प्रदर्शित होणार आहे. रिपोर्टनुसार, या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले असून सध्या त्याचे डबिंग सुरू आहे. चित्रपटाच्या पोस्ट प्रोडक्शनचे काम लवकरच सुरू होणार आहे.
प्रभासचा आदिपुरुष हा चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. अभिनेता प्रभासनं आदिपुरुष या चित्रपटात प्रभू श्रीरामाची भूमिका साकारली 'आहे तर अभिनेत्री कृती सेनननं या चित्रपटात सीता ही भूमिका साकारली आहे. आता प्रभास हा सालार आणि प्रोजेक्ट के या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. प्रभासच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
संबंधित बातम्या
Salaar Release Date : प्रतीक्षा संपली! प्रभासचा 'सालार' 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला