एक्स्प्लोर
'याड लागलं'चं हे व्हर्जन एकदा ऐकाच!

मुंबई: महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात धुमाकूळ घालणाऱ्या सैराट सिनेमाची जादू आजही कायम आहे. रुळेलेल्या वाटा मोडत दिग्दर्शक नागराज मंजुळेने सैराट सिनेमा प्रदर्शित करुन आता वर्ष होत आहे. मात्र सैराट सिनेमा आणि त्यातील गाणी आजही प्रेक्षकांना भारावून सोडत आहेत. केवळ मराठीत नव्हे तर देशभर या सिनेमाचं गारुड आहे. या सिनेमातील याड लागलं, आताच बया, सैराट झालं जी आणि झिंगाट या गाण्यांनी तर धुमाकूळ घातला. अशी एकही मिरवणूक नाही की लग्नाची वरात नाही, कोणता बँड नाही की बेंजो नाही, ज्यामध्ये झिंगाट गाणं वाजलं नाही असं नाही. दुसरीकडे याड लागलं या गाण्याचं संगीत तर अंगावर शहारं आणणारं आहे. अजय-अतुलच्या संगीताची जादू चाहत्यांना भुरळ घालते. त्याचीच प्रचिती दिल है हिंदुस्तानी या रिअलिटी शोमध्येही आली. म्युझिक ग्रुप युफोनी बँडने याड लागलं हे गाणं गायलं आणि उपस्थितांना अक्षरश: अवाक् करुन सोडलं. सध्या या गाण्याच्या व्हिडीओला यूट्यूबवर असंख्य हिट्स मिळत आहेत. पाहा त्याच गाण्याची एक झलक
आणखी वाचा























