एक्स्प्लोर
रोहित शेट्टी अजय देवगनसोबत 'या' मराठी सिनेमाचा रिमेक बनवणार!
मुंबई : दिग्दर्शक रोहित शेट्टी अभिनेता अजय देवगनला घेऊन 'झाला बोभाटा' या मराठी सिनेमाचा रिमेक बनवणार असल्याची माहिती आहे. या सिनेमाचा ट्रेलर पाहून रोहित शेट्टी भारावून गेला. त्यानंतर त्याने याचा हिंदी रिमेक बनवण्याचा निर्णय घेतला.
अजय देवगन आणि रोहित शेट्टी सध्या गोलमान सीरिजच्या 'गोलमाल अगेन' या सिनेमाच्या तयारीत आहेत. ट्रेलर पाहिल्यानंतर रोहित शेट्टीने संपूर्ण सिनेमा पाहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर 'झाला बोभाटा'चे दिग्दर्शक अनुप जगदाळे यांनी स्पेशल स्क्रीनिंगचं आयोजन केलं होतं.
संपूर्ण सिनेमा पाहिल्यानंतर रोहित शेट्टीने या सिनेमाचा हिंदी रिमेक बनवण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातंय. 'झाला बोभाटा' येत्या 6 जानेवारी 2017 ला रिलीज होणार आहे.
'झाला बोभाटा' रिलीज झाल्यानंतर रोहित शेट्टी या सिनेमाचे हक्क विकत घेण्याची शक्यता आहे. तो सध्या 'गोलमाल अगेन'च्या शूटिंगला सुरुवात करण्याच्या तयारीत आहे, तर अजय देवगनही आगामी 'बादशाहो' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यादरम्यानच 'झाला बोभाटा'च्या रिमेकविषयी निर्णय होऊ शकतो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement