एक्स्प्लोर

बॉक्स ऑफिसचा बादशाह किंग खान.. तरीही आपला भाऊ काही ऐकत नसतो; रितेश-जिनिलियाच्या 'वेड'ची वाटचाल 100 कोटींच्या दिशेने

Ved : 'वेड' आणि 'वाळवी' हे मराठी सिनेमे प्रेक्षकाचे प्रेम मिळवण्यात यशस्वी ठरला आहे.

Ved Vaalvi Marathi Movie Box Office Collection : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathaan) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. पण दुसरीकडे रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया देशमुखचा (Genelia Deshmukh) 'वेड' हा सिनेमादेखील 'पठाण'च्या त्सुनामीत चाहत्यांना 'वेड' लावण्यात यशस्वी ठरला आहे. 

'वेड' हा सिनेमा 30 डिसेंबर 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता सिनेमागृहात या सिनेमाचे 31 दिवस पूर्ण झाले आहे. आतापर्यंत या सिनेमाने 70.90 कोटींची कमाई केली आहे. हा सिनेमा 100 कोटींच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत हा सिनेमा नागराज मंजुळेच्या 'सैराट'ला मागे टाकू शकतो. रितेश देशमुखने खास पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

'वाळवी'ची हिंदी सिनेमावर मात

परेश मोकाशी दिग्दर्शित 'वाळवी' या सिनेमालादेखील प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. 'पठाण' सारखा बिग बजेट सिनेमा शर्यतीत असतानाही 'वाळवी' सिनेमाने तिसऱ्या आठवड्यातही आपले स्थान कायम ठेवले आहे. यावरूनच मराठी प्रेक्षक 'वाळवी'ला पसंती देत आहेत हे सिद्ध झालं आहे.  या आठवड्यातही काही थिएटरमध्ये 'वाळवी'चे शोज तिप्पट पटीने वाढवण्यात आले आहेत. 

कोरोनानंतर प्रेक्षकांच्या भेटीला आलेली फ्रेश जोडी आणि फ्रेश कथा सिनेरसिकांना पुन्हा एकदा सिनेमागृहाकडे वळवण्यात यशस्वी ठरली आहे. कोरोनामुळे सिनेप्रेमी ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमा पाहायला पसंती दर्शवत होते. पण कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर प्रेक्षकांची पाऊले सिनेमागृहाकडे वळवण्यात 'वेड' आणि 'वाळवी' या दोन्ही सिनेमांना यश आलं आहे. 

'वेड' या सिनेमाचं बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी कौतुक केलं आहे. तर 'वाळवी' या सिनेमाचं मराठी सिनेसृष्टीतील अनेक मंडळींनी खास पोस्ट लिहित कौतुक केलं आहे. सध्याच्या घडीला मराठी सिनेसृष्टी समृद्ध करण्यात हे दोन्ही सिनेमे यशस्वी झाले आहेत. अनेक सिनेमागृहांनी या दोन्ही सिनेमाचे शोज वाढवले आहेत. त्यामुळे वर्षाच्या सुरुवातीलाच या दोन्ही सिनेमांनी मराठी सिनेसृष्टीला सुगीचे दिवस दाखवले आहेत. त्यामुळे हे वर्ष मराठी सिनेसृष्टीसाठी नक्कीच खास असणार आहे.

संबंधित बातम्या

लोक म्हणाले माझे सिनेमे चालणार नाहीत, मी रेस्टोरंट उघडण्याचा विचार केला, 'पठाण'च्या यशानंतर शाहरुख भरभरुन बोलला

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी

व्हिडीओ

Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!
Sanjay Raut PC : मराठी माणसाच्या तोंडावर पिचकाऱ्या मारण्याचा काम भाजपने केलं, संजय राऊतांचा घणाघात
Lay Bhari Award 2025 : लय भारी पुरस्कार 2025
Rahul Narvekar On Election : पराभव दिसू लागल्यानं राऊतांचे बिनबुडाचे आरोप, नार्वेकरांची टीका
Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी
अशोक चव्हाणांनी 50 लाख घेऊन तिकीट दिलं, माजी नगरसेवकाचा आरोप; लातूरमध्येही निष्ठावंतांकडून बंडाचे निशाण
अशोक चव्हाणांनी 50 लाख घेऊन तिकीट दिलं, माजी नगरसेवकाचा आरोप; लातूरमध्येही निष्ठावंतांकडून बंडाचे निशाण
Gold Rate : गुड न्यूज, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर
गुड न्यूज, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर
Marathi Sahitya Sammelan: विश्वास पाटील माफी मागा, अन्यथा मराठी साहित्य संमेलन उधळून लावू; संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची तातडीची बैठक
विश्वास पाटील माफी मागा, अन्यथा मराठी साहित्य संमेलन उधळून लावू; संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची तातडीची बैठक
KDMC मध्ये महायुतीची घोडदौड, 9 उमेदवार बिनविरोध, रवींद्र चव्हाणांपाठोपाठ श्रीकांत शिंदेंचाही मास्टरस्ट्रोक
KDMC मध्ये महायुतीची घोडदौड, 9 उमेदवार बिनविरोध, रवींद्र चव्हाणांपाठोपाठ श्रीकांत शिंदेंचाही मास्टरस्ट्रोक
Embed widget