Rashid Khan Hospitalised : 'तोरे बिना मोहे चैन नहीं'चे गायक राशिद खान रुग्णालयात दाखल; प्रकृती चिंताजनक
Rashid Khan : लोकप्रिय शास्त्रीय गायक राशिद खान यांना कोलकातातील रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
Rashid Khan : लोकप्रिय शास्त्रीय गायक राशिद खान (Rashid Khan) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कोलकातातील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 55 वर्षीय राशिद खान हे प्रोस्टेट कर्करोगाने ग्रस्त आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, टाटा मेमोरियल कॅन्सर रुग्णालयात राशिद खान उपचार घेत आहेत.
राशिद खान रुग्णालयात दाखल
मीडिया रिपोर्टनुसार, शास्त्रीय गायक राशिद खान यांना 23 डिसेंबर 2023 रोजी कोलकातातील एका रुग्णालायत दाखल करण्यात आलं होतं. राशिद खान यांची प्रकृती चिंताजनक असल्याने चाहते चिंता व्यक्त करत आहेत. तसेच त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत.
राशिद खान यांच्याबद्दल जाणून घ्या... (Who is Rashid Khan)
राशिद खान दररोज पहाटे चार वाजता उठून रियाज करतात. वयाच्या 11 व्या वर्षी त्यांनी संगीतक्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. रामपुर-सहसवान घराण्यातील ते आहेत. मेहबूब खान हे त्यांच्या वडिलांचे नाव असून आईचे नाव हुसैन खान आहे. राशिद खान यांनी अनेक बंगाली गाणी गायली आहेत. 'तोरे बिना मोहे चैन नहीं' आणि 'आओगे जब तू' सारख्या गाण्यांना लोकप्रिय बॉलिवूड गाण्यांना राशिदने आवाज दिला आहे. तसेच 'माय नेम इज खान', 'राज 3', 'बापी बारी जा','कादंबरी', 'शादी मैं जरुर आना','मंटो' आणि 'मीटिन मास' सारख्या बॉलिवूडपटांतील गाणी त्यांनी गायली आहेत.
राशिद खान यांनी पद्मश्रीसह संगीत नाटक अकादमी पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं आहे. तसेच सर्वोच्च नागरिक पुरस्कार पद्मभूषणदेखील त्यांना प्रदान करण्यात आला आहे. आईटीसी या संगीत कार्यक्रमाच्या माध्यमातून राशिद खान यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली.
उस्ताद राशिद खान हे संगीत क्षेत्रातील मोठं नाव आहे. उत्तर प्रदेशातील बदायुन येथील सहस्वान येथे राशिद खान यांचा जन्म झाला. त्यांनी उस्ताद निसार हुसैन खान यांच्याकडून प्रारंभिक प्रशिक्षण घेतलं आहे. उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे ते पुतणे आहेत. संगीताचं प्रशिक्षण निसार हुसेन खान यांच्याकडून त्यांनी घेतलं आहे.
राशिद खान यांना संगीतात फारसा सर नव्हता. त्यांचे काका गुलाम मुस्तफा खान हे त्यांच्या संगीत कौशल्याची नोंद घेणारे पहिले होते. मुंबईतही त्यांनी काही काळ प्रशिक्षण घेतलं आहे. वयाच्या 18 व्या वर्षानंतर राशिदला संगीताचा आनंद वाटू लागला. त्यानंतर खऱ्या अर्थाने एका महान संगीत पर्वाची सुरुवात झाली.
संबंधित बातम्या