एक्स्प्लोर

Ranbir Kapoor And Alia Bhatt: रणबीर कपूर आणि आलिया रामलल्लाचं घेणार दर्शन; अयोध्येतील राम मंदिराच्या उद्धाटन सोहळ्याचं मिळालं निमंत्रण

अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांना राम मंदिराच्या (Ram Temple) उद्धाटन सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आलं आहे.

Ranbir Kapoor And Alia Bhatt: अयोध्येत (Ayodhya) 22 जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिराच्या (Ram Temple) उद्धाटन सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. कार्यक्रमाला येणाऱ्या पाहुण्यांना आमंत्रण पाठवण्यात आले आहे. बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांनाही या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. या जोडप्याला निमंत्रण देण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य उपस्थित होते.

रणबीर आणि आलियाला देण्यात आलं निमंत्रण

रणबीर कपूर आणि त्याची पत्नी आलिया यांना आरएसएसचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर, आरएसएस कोकणचे प्रांतीय प्रचार प्रमुख अजय मुडपे आणि निर्माता महावीर जैन यांच्याकडून श्री रामजन्मभूमी मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी आमंत्रणे मिळाली आहेत. आलिया आणि रणबीर हे  निमंत्रण स्विकारतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

बॉलिवूडमधील 'या' कलाकारांना देण्यात आलं आमंत्रण

बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध कलाकार राम मंदिराच्या उद्धघाटन सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत, अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, अनुपम खेर, अक्षय कुमार, रजनीकांत, संजय लीला भन्साळी, चिरंजीवी, मोहनलाल, धनुष, ऋषभ शेट्टी मधुर भांडारकर, रणबीर कपूर, आलिया भट्ट, अजय भट्ट, सनी देओल , प्रभास आणि यश यांना राम मंदिराच्या  उद्धाटन कार्यक्रमाचे आमंत्रण पाठवण्यात आले आहे.

राम मंदिराच्या उद्धाटन सोहळ्याला 22 जानेवारीला एक लाखाहून अधिक भाविक अयोध्येत दाखल होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे सरचिटणीस चंपत राय यांनी यापूर्वी सांगितले होते की, पारंपारिक नगर शैलीत बांधलेले राम मंदिर परिसर 380 फूट लांब (पूर्व-पश्चिम दिशा), 250 फूट रुंद आणि 161 फूट उंच असेल.

राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला वारकरी संप्रदायातील संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ यांचे वंशज उपस्थित राहणार आहेत.मुख्य समारंभासाठी विश्व हिंदू परिषदेचे सुमारे 100 सदस्य आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 25 अधिकाऱ्यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Ram Mandir Inauguration: 'रामायण'मधील लक्ष्मणाला मिळाले नाही राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण; अभिनेत्यानं व्यक्त केली खंत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिवसेना बंडावेळी कैलास पाटील लालचेपोटी ठाकरेंकडे गेले; अजित पिंगळेंचा खळबळजनक आरोप
शिवसेना बंडावेळी कैलास पाटील लालचेपोटी ठाकरेंकडे गेले; अजित पिंगळेंचा खळबळजनक आरोप
Jitendra Awhad on Chhagan Bhujbal : छगन भुजबळ म्हणतात, 'ईडीपासून सूटका माझ्यासाठी पुनर्जन्मच होता', आता आव्हाडांच्या दोनच वाक्यांनी लक्ष वेधले!
छगन भुजबळ म्हणतात, 'ईडीपासून सूटका माझ्यासाठी पुनर्जन्मच होता', आता आव्हाडांच्या दोनच वाक्यांनी लक्ष वेधले!
Sanjay Raut: एकनाथ शिंदे मोदी-शाहांच्या पायाशी गहाण पडलेत; शरीर वाघाचं पण काळीज उंदराचं: संजय राऊत
एकनाथ शिंदे मोदी-शाहांच्या पायाशी गहाण पडलेत; शरीर वाघाचं पण काळीज उंदराचं: संजय राऊत
प्रत्येकाला मोकळा श्वास घ्यायचा होता, म्हणून आपल्या नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसला; भुजबळांच्या दाव्यावर संजय राऊतांचा वार
प्रत्येकाला मोकळा श्वास घ्यायचा होता, म्हणून आपल्या नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसला; भुजबळांच्या दाव्यावर संजय राऊतांचा वार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Book : छगन भुजबळांसंबंधी पुस्तकात काय आहेत  कथित  दावे ?ABP Majha Headlines :  10 AM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM : 8 नोव्हेंबर 2024 : ABP MAJHABaba Siddique Case  Update :  बाबा सिद्दीकी प्रकरणी आरोपीकडून कटाची माहिती उघड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिवसेना बंडावेळी कैलास पाटील लालचेपोटी ठाकरेंकडे गेले; अजित पिंगळेंचा खळबळजनक आरोप
शिवसेना बंडावेळी कैलास पाटील लालचेपोटी ठाकरेंकडे गेले; अजित पिंगळेंचा खळबळजनक आरोप
Jitendra Awhad on Chhagan Bhujbal : छगन भुजबळ म्हणतात, 'ईडीपासून सूटका माझ्यासाठी पुनर्जन्मच होता', आता आव्हाडांच्या दोनच वाक्यांनी लक्ष वेधले!
छगन भुजबळ म्हणतात, 'ईडीपासून सूटका माझ्यासाठी पुनर्जन्मच होता', आता आव्हाडांच्या दोनच वाक्यांनी लक्ष वेधले!
Sanjay Raut: एकनाथ शिंदे मोदी-शाहांच्या पायाशी गहाण पडलेत; शरीर वाघाचं पण काळीज उंदराचं: संजय राऊत
एकनाथ शिंदे मोदी-शाहांच्या पायाशी गहाण पडलेत; शरीर वाघाचं पण काळीज उंदराचं: संजय राऊत
प्रत्येकाला मोकळा श्वास घ्यायचा होता, म्हणून आपल्या नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसला; भुजबळांच्या दाव्यावर संजय राऊतांचा वार
प्रत्येकाला मोकळा श्वास घ्यायचा होता, म्हणून आपल्या नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसला; भुजबळांच्या दाव्यावर संजय राऊतांचा वार
Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या आज सांगली, कोल्हापूर, सातारमध्ये सभा; कोल्हापूर दक्षिणला सभा होणार की नाही?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या आज सांगली, कोल्हापूर, सातारमध्ये सभा; कोल्हापूर दक्षिणला सभा होणार की नाही?
Devendra Fadnavis : फेक नॅरेटिव्ह फॅक्टरीचे शरद पवार मालक तर सुप्रिया सुळे व्यवस्थापिका; देवेंद्र फडणवीस कडाडले
फेक नॅरेटिव्ह फॅक्टरीचे शरद पवार मालक तर सुप्रिया सुळे व्यवस्थापिका; देवेंद्र फडणवीस कडाडले
Maharashtra Assembly Elections 2024 : विशाल पाटील म्हणाले, मिरजमध्ये 'मशाल सोबत विशाल अन् हातात घड्याळ', जयंत पाटलांनी काढला चिमटा, नेमकं काय घडलं?
विशाल पाटील म्हणाले, मिरजमध्ये 'मशाल सोबत विशाल अन् हातात घड्याळ', जयंत पाटलांनी काढला चिमटा, नेमकं काय घडलं?
Chhagan Bhujbal: मी ईडीपासून मुक्तीसाठी भाजपसोबत गेलो, छगन  भुजबळ यांच्या स्फोटक दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
मी ईडीपासून मुक्तीसाठी भाजपसोबत गेलो, छगन भुजबळ यांच्या स्फोटक दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Embed widget