एक्स्प्लोर

Ram Mandir Inauguration: 'रामायण'मधील लक्ष्मणाला मिळाले नाही राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण; अभिनेत्यानं व्यक्त केली खंत

Ram Mandir Inauguration: 'रामायण' या मालिकेतील लक्ष्मण ही भूमिका साकारणारे अभिनेते सुनील लाहिरी (Sunil Lahri) यांना राम मंदिराच्या भव्य उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आलेलं नाही.

Ram Mandir Inauguration: अयोध्या राम मंदिराच्या  (Ram Mandir Inauguratio) भव्य उद्घाटन सोहळ्याची तयारी सध्या उत्साहात सुरू आहे. राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला बॉलिवूड तसेच टॉलिवूडमधील कलाकार देखील सहभागी होणार आहेत. 'रामायण' या लोकप्रिय मालिकेतील प्रभू श्री रामाची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल (Arun Govil) यांना  राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण पाठवण्यात आले आहे. तसेच सीता मातेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलिया यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. पण 'रामायण' या मालिकेतील लक्ष्मण ही भूमिका साकारणारे अभिनेते सुनील लाहिरी (Sunil Lahri) यांना या भव्य कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आलेलं नाही. यामुळे ते  नाराज झाले आहेत. सुनील लाहिरी यांनी याबाबत एका मुलाखतीमध्ये प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले सुनील लाहिरी?

ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुनील लाहिरी यांनी सांगितलं की, 'प्रत्येक वेळी तुम्हाला बोलावलेच पाहिजे असे नाही. मला बोलावले असते तर मी नक्कीच गेलो असतो. मला आमंत्रित केले असते तर चांगले झाले असते. मलाही इतिहासाचा भाग होण्याची संधी मिळाली असती, पण हरकत नाही. पण याबाबत काळजी करण्यासारखे काही नाही.

'रामायण' मालिकेच्या निर्मात्यांनाही निमंत्रित करण्यात आलेले नाही, यावरही सुनील लाहिरी यांनी आश्चर्य व्यक्त केलं. ते म्हणाले, 'कदाचित त्यांना वाटत असेल की, मालिकेतील लक्ष्मणाचे पात्र तितकेसे महत्त्वाचे नाही किंवा त्यांना मी वैयक्तिकरित्या आवडत नाही. मी प्रेमसागर यांच्यासोबत होतो, पण त्यांनाही आमंत्रण मिळालेलं नाही. मला हे विचित्र वाटते की त्यांनी रामायणाच्या कोणत्याही निर्मात्यांना आमंत्रित केले नाही."

सुनील लाहिरी पुढे म्हणाले, 'कुणाला निमंत्रित करायचे की नाही, हा समितीचा वैयक्तिक निर्णय आहे. मी ऐकले की 7000 पाहुणे आणि 3000 VIP आमंत्रित आहेत. त्यामुळे मला वाटते की त्यांनी रामायण मालिकेशी संबंधित असलेल्यांना, विशेषत: मुख्य कलाकार आणि निर्मात्यांनाही आमंत्रित करायला हवे होते.'

View this post on Instagram
 
A post shared by Sunil Lahri (@sunil_lahri)

बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना राम मंदिराच्या भव्य उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण मिळालं आहे. यामध्ये रणबीर कपूर, आलिया भट्ट,अनुपम खेर यांचा समावेश आहे.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Ayodhya Ram Mandir: बॉलिवूडपासून टॉलिवूडपर्यंत; कलाकारांची सुद्धा मांदियाळी जमणार! 'या' कलाकारांना मिळाले राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Embed widget