(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Hit-The First Case : बॉक्स ऑफिसवर राजकुमार रावच्या 'हिट'ची जादू; पहिल्या वीकेंडमध्ये केली कोट्यवधींची कमाई
हिट-द फर्स्ट (Hit-The First Case)या चित्रपटानं पहिल्या वीकेंडमध्ये कोट्यवधींची कमाई केलेली आहे.तरण आदर्शनं या चित्रपटाच्या पहिल्या वीकेंडच्या कमाईबाबत सांगितलं.
Hit-The First Case : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता राजकुमार रावचा (Rajkummar Rao) हिट-द फर्स्ट (Hit-The First Case) हा चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटानं पहिल्या वीकेंडमध्ये कोट्यवधींची कमाई केलेली आहे. तरण आदर्शनं या चित्रपटाच्या पहिल्या वीकेंडच्या कमाईबाबत सांगितलं.
'हिट' चित्रपटाची पहिल्या वीकेंडची कमाई
बॉलिवूडमधील चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन राजकुमार रावच्या हिट-द फर्स्ट या चित्रपटाच्या कलेक्शनबाबत सांगितलं. तरण आदर्श यांच्या पोस्टनुसार हिट या चित्रपटानं रविवारी 2.23 कोटींची कमाई बॉक्स ऑफिसवर केली. ही कमाई शुक्रवार आणि शनिवारच्या तुलनेत जास्त आहे. अभिनेत्री तापसी पन्नूच्या शब्बास मिथ्थू या चित्रपटाला हिट चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर मागे टाकलं आहे. क्रिटिक्स आणि प्रेक्षकांकडून हिट चित्रपटाबाबत चांगली प्रतिक्रिया येत आहे.
View this post on Instagram
तीन दिवसांची कमाई
हिट या चित्रपटामध्ये राजकुमार रावसोबतच सान्या मल्होत्रानं देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटानं रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी 1.35 कोटींची कमाई केली आहे. तसेच शनिवारी या चित्रपटानं 2.01 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटानं तीन दिवसात 5.59 कोटींची कमाई केली आहे. 15 जुलैला हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटातील 'तिनका' गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
राजकुमारचे चित्रपट
राजकुमारने ‘लव्ह सेक्स और धोखा’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्याच्या बधाई दो, हम दो हमारे दो, स्त्री, रुही या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.
हेही वाचा:
Rajkummar Rao : राजकुमार रावने शेअर केले स्ट्रगलच्या दिवसांची आठवण करून देणारे काही किस्से!
Rajkummar Rao : मित्रांकडून उधार पैसे घेऊन जगत होता राजकुमार राव, आज आहे करोडोंचा मालक