Rajkummar Rao : मित्रांकडून उधार पैसे घेऊन जगत होता राजकुमार राव, आज आहे करोडोंचा मालक
Rajkummar Rao : अभिनेता राजकुमार राव हा एकेकाळी मित्रांकडून उधार पैसे घेऊन जगत होता. परंतु, आज तो करोडो रूपयांच्या संपत्तीचा मालक आहे.

Rajkummar Rao : बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव याची इंडस्ट्रीतील टॉप कलाकार म्हणून ओळख आहे. त्याने आतापर्यंत स्त्री, शादी में जरूर आना, बधाई हो सारखे अनेक हिट चित्रपट दिले आहेत. आपल्या मेहनतीच्या जोरावर त्याने करिअरमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. राजकुमार राव आज करोडोंचा मालक आहे. परंतु, एक काळ असा होता की, त्याच्या बॅंक खात्यात फक्त 18 रुपये शिल्लक होते. इतकेच नाही तर त्याला जगण्यासाठी मित्रांकडून पैसे उधार घ्यावे लागत होते.
राजकुमार राव याने एका मुलाखतीमध्ये स्वत: त्याच्या स्ट्रगलच्या दिवसांची आठवण करून देणारे काही किस्से शेअर केले आहेत. "मी मुंबईत आलो होतो, त्यावळी खूप लहान ठिकाणी राहत असे. एक काळ असा होता जेव्हा पैसे पूर्णपणे संपत असत. एकदा माझ्या मोबाईलवर मेसेज आला की माझ्या खात्यात 18 रुपये शिल्लक होते आणि माझ्या मित्राकडे 23 रुपये होते, असे राजकुमार राव सांगतो.
View this post on Instagram
राजकुमार याने सांगितले की, FTII हा एक मोठा समुदाय आहे. आम्ही त्यावेळी पैसे उधार घ्यायचो. इतकंच नाही तर अनेक वेळा तो मित्रांच्या घरी जाऊन त्यांच्यासोबत जेवण वाटून खात असे. एका वेळी टी-शर्ट खरेदी करण्यासाठी माझ्याकडे पुरेसे पैसे नव्हते."
राजकुमार राव याने सुरूवातीच्या काळात असे हलाखीत दिवस काढले आहेत. परंतु, आज तो करोडो रूपयांच्या संपत्तीचा मालक आहे. आपल्या कष्टाच्या जोरावर त्याने फिल्म इंडस्ट्रीत स्वत: ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
महत्वाच्या बातम्या
Rajkummar Rao-Patralekhaa : राजकुमार रावकडून पत्नीला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा, पत्रलेखासोबतचा फोटो शेअर करत म्हणाला..
Badhaai Do : राजकुमार राव आणि भूमी पेडणेकरच्या 'बधाई दो' सिनेमाचे नवे पोस्टर प्रदर्शित
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
