एक्स्प्लोर
रिलीजआधीच रजनीकांतच्या '2.0' ने 'बाहुबली 2' चा रेकॉर्ड मोडला!
मुंबई : प्रभासच्या 'बाहुबली 2' आणि रजनीकांत-अक्षय कुमार यांच्या '2.0' या सिनेमांमध्ये जोरदार टक्कर सुरु आहे. रिलीजआधीच दोन्ही चित्रपटांनी अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. आता चाहतेही दोन्ही चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहेत.
'बाहुबली 2' च्या ट्रेलरने व्ह्यूव्जच्या बाबतीत रजनीकांत यांच्या 'कबाली' सिनेमाचा रेकॉर्ड मोडला. पण '2.0' ने सॅटेलाईट राईट्सच्या बाबतीत 'बाहुबली 2' ला मागे टाकलं आहे.
'2.0' च्या हिंदी, तेलुगु आणि तामीळ व्हर्जनचे सॅटेलाईट राईट्स 110 कोटी रुपयांना विकले गेले आहेत. तर 'बाहुबली 2'ला 78 कोटी रुपयांतच समाधान मानावं लागलं. 78 कोटींपैकी हिंदी व्हर्जनचे सॅटेलाईट राईट्स 50 कोटी रुपयांना खरेदी केले आणि मल्याळम, तामिळ आणि तेलुगु व्हर्जनचे राईट्स 28 कोटी रुपयात खरेदी करण्यात आले.
'बाहुबली 2' पुढील महिन्यात 28 एप्रिलला देशभरात प्रदर्शित होणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement