एक्स्प्लोर
सलमानला धंदा दिसतो, शहिदांचं बलिदान नाही, राज ठाकरेंचा घणाघात
मुंबई : अखेर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या पाकिस्तानी कलाकारांच्या पुळक्याबाबत मौन सोडलं आहे. 'टाईम्स नाऊ' या इंग्रजी वृत्तावाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंनी सलमान खानवर जोरदार टीकास्त्र सोडलं. सलमान खानला केवळ धंदा दिसतो, मात्र जवानांचं बलिदान दिसत नाही, अशा शब्दात राज ठाकरेंनी सलमान खानचा खरपूस समाचार घेतला.
"कलेला सीमा नसतात वगैरे बोलणं ठीक आहे. मीही एक कलाकार आहे. कलाकार काही आकाशातून पडत नाहीत. मात्र, उरी हल्ल्याचा पाकिस्तानी कलाकारांना निषेध करण्यास सांगूनही, त्यांनी निषेध केला नाही.", असे म्हणत राज यांनी पाकिस्तानी कलाकारांवर निशाणा साधला.
उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना भारतात थारा नको, अशी भूमिका घेत मनसेने पाक कलाकारांना विरोध केला. यानंतर अनेक पाकिस्तानी कलाकार आपापल्या घरी परतले. मात्र, त्यानंतर सलमान खानने पाक कलाकारांची पाठराखण करत कलाकार आणि दहशतवादी यांच्यात फरक असतो, असं म्हटलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement