एक्स्प्लोर
इंदिरा गांधींच्या बायोपिकविरोधात हायकोर्टात याचिका
नवी दिल्लीः माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा जीवनपट '31 ऑक्टोबर'च्या प्रदर्शनाविरोधात दिल्ली हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. हा सिनेमा देशातील सर्वात जुन्या राजकीय पक्षाच्या विचार धारेविरोधात आहे, असं याचिकेत म्हटलंय.
इंदिरा गांधी यांची 31 ऑक्टोबर 1984 रोजी हत्या करण्यात आली. त्यावेळी शिखविरोधी उसळलेल्या दंगली आणि इतर परिस्थितीवर हा सिनेमा आधारित आहे. सिनेमातील अभिनेत्री सोहा अली खाल आणि वीर दास यांच्यात अनेक असे दृष्य आहेत, ज्यांचा उद्देश केवळ राजकारण करणं आहे. त्यामुळे या सिनेमाचं प्रदर्शन होऊ देऊ नये, असं याचिकेत म्हटलं आहे.
सिनेमात एकाच विशिष्ट व्यक्तीला लक्ष्य करण्यात आलं आहे. ज्यामुळे त्यांच्याविषयी घृणा निर्माण होते, असं याचिकाकर्ते अजय कटारा यांनी याचिकेत म्हटलं आहे. सिनेमातील काही दृष्य हटवण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
पाहा सिनेमाचा ट्रेलरः
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement