OTT Upcoming Web Series : Aarya 2 पासून Mirzapur 3 पर्यंत या वेबसीरिजची प्रेक्षक पाहत आहेत आतुरतेने वाट
OTT Upcoming Web Series : लवकरच अनेक मोठ्या वेबसिरीजचे नवीन सीझन OTT वर प्रदर्शित होणार आहेत. आर्य 2 पासून मिर्झापूर 3, मनी हेस्ट 5, असुर 2 पर्यंत अनेक लोकप्रिय वेबसीरिजचा यात समावेश आहे.
OTT Upcoming Web Series : टीव्ही आणि सिनेमानंतर प्रेक्षक आता ओटीटी माध्यमाकडे वळाले आहेत. गेल्या काही वर्षांत ओटीटी माध्यमाची लोकप्रियतादेखील वाढली आहे. प्रेक्षक एक वेबसीरिज संपल्यानंतर दुसऱ्या वेबसीरिजची प्रतिक्षा करताना दिसत आहेत. येत्या काळात अनेक लोकप्रिय वेबसीरिजचे नवे सीझन येणार आहेत. प्रेक्षकदेखील या वेबसीरिजची आतुरतेने वाट पाहत आहेत. यात सुष्मिता सेनच्या 'आर्या 2' ते 'मिर्झापूर 3', 'मनी हीस्ट 5', 'असुर 2' अशा अनेक लोकप्रिय वेबसीरिजचा समावेश आहे.
आर्या 2 : सुष्मिताच्या 'आर्या-2' (Aarya 2) या वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरमधील सुष्मिताच्या अभिनयाने अनेकांचे लक्ष वेधले आहे. आता आर्या-2 चा ट्रेलर पाहून सुष्मिताचे चाहते या सीरिजची उत्सुकतेने वाट पाहात आहेत. 10 डिसेंबरला हॉटस्टारवर ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मनी हीस्ट 5 : 'मनी हीस्ट' या वेबसीरिजने जगभरात लोकप्रियता मिळवली आहे. मनी हीस्टच्या पाचव्या भागाचा दुसरा भाग डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ही वेबसीरिज 3 डिसेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
असुर 2 : अर्शद वारसी आणि बरुण सोबती यांच्या 'असुर 2' या वेबसीरिजचे सध्या शूटिंग सुरू आहे. या वेबसीरिजच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.
दिल्ली क्राइम 2 : दिल्ली गँग रेपवर बनलेल्या दिल्ली क्राइम या वेबसीरिजच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. आता या वेबसीरिजच्या दुसऱ्या सीझनच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.
मिर्झापूर 3 : मिर्झापूरचे आतापर्यंत दोन सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या सीझनमधली पंकज त्रिपाठीची भैय्याची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. मिर्झापूरचा तिसरा सीझनदेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
संबंधित बातम्या
Bigg Boss 15 : Rakhi Sawant आणि Abhijit Bichukale चा 'बिग बॉस'मध्ये दिसणार जलवा
Salman Khan : 'एक था टायगर', 'टायगर जिंदा है' नंतर भाईजानचा 'Tiger 3' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Ram Charan Acharya Teaser : 'आचार्य' सिनेमाचा टीझर प्रदर्शित, 24 तासांत मिळाले 'इतके' व्ह्यूज
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha