Nayanthara Birthday: वयाच्या 19 व्या वर्षी अभिनय क्षेत्रात केलं पदार्पण अन् झाली साऊथची 'लेडी सुपरस्टार'; नयनताराचं खरं नाव माहितीये?
Nayanthara Birthday: नयनताराला साऊथची 'लेडी सुपरस्टार' असं देखील म्हटले जाते. आज नयनताराच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात तिच्या चित्रपटांबद्दल आणि तिच्या खऱ्या नवाबद्दल...
Nayanthara Birthday: साऊथ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नयनताराचा (Natyanthara) आज (18 नोव्हेंबर) वाढदिवस आहे. नयनतारानं अनेक चित्रपटांमध्ये काम केले, जे बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले. नयनताराला साऊथची 'लेडी सुपरस्टार' असं देखील म्हटले जाते. आज नयनताराच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात तिच्या चित्रपटांबद्दल आणि तिच्या खऱ्या नवाबद्दल...
नयनताराचं खरं नाव काय?
नयनताराचे खरे नाव डायना मरियम कुरियन असं आहे. 1984 मध्ये तिचा जन्म कर्नाटकात झाला. नयनतारा तिच्या कुटुंबासह केरळमधील तिरुवल्ला येथे शिफ्ट झाली. सुरुवातीला नयनताराने अँकर आणि मॉडेल म्हणून काम केले. त्यानंतर तिनं अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली.
वयाच्या 19 व्या वर्षी अभिनय क्षेत्रात केलं पदार्पण
नयनताराने वयाच्या 19 व्या वर्षी अभिनय क्षेत्रात एन्ट्री केली. तिनं 2003 मध्ये रिलीज झालेल्या मानसीनक्करे या मल्याळम चित्रपटामधून नयनतारानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर दोन वर्षातच नयनताराला रजनीकांत यांच्या 'चंद्रमुखी' (2005) चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. अनामिका , माया , ऐरा नेत्रिकन, गजनी , बिल्ला, यारादी नी मोहिनी , बॉडीगार्ड, कृष्णम वंदे जगद्गुरुम् , थानी ओरुवन यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये देखील नयनताराने काम केले.
नयनतारा आणि विग्नेश शिवन यांनी बांधली लग्नगाठ
गेल्या वर्षी नयनतारा आणि विग्नेश शिवन यांनी लग्नगाठ बांधली. त्यांच्या विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. 'नयनतारा बियोंड द फेरी टेल' या डॉक्युमेंट्रीमध्ये नयनतारा आणि विग्नेश यांची लव्हस्टोरी दाखवण्यात आली आहे. त्यानंतर नयनतारा आणि विग्नेश हे जुळ्या मुलांची पालक झाले.
View this post on Instagram
बॉलिवूडमध्ये केली धमाकेदार एन्ट्री
2023 मध्ये नयनताराने शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. या चित्रपटात नयनतारा आणि शाहरुख खान यांचा रोमँटिक अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळाला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. याशिवाय विजय सेतुपती, प्रियामणी, सान्या मल्होत्रा, सुनील ग्रोव्हर आणि योगी बाबू यांच्याही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. अॅटली यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. या चित्रपटामधील नयनतारा आणि शाहरुख यांच्या केमिस्ट्रीनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :