Haddi trailer: नवाजुद्दीन सिद्दीकीच्या 'हड्डी' चा ट्रेलर रिलीज; चित्रपट 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस
नवाजुद्दीन सिद्दीकीचा (Nawazuddin Siddiqui) हड्डी (Haddi) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
Haddi trailer: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या (Nawazuddin Siddiqui) आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. लवकरच त्याचा हड्डी (Haddi) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्याच्या या चित्रपट ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमधील नवाजुद्दीनच्या डायलॉग्सनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
हड्डी या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीसोबतच अनुराग कश्यप (Anurag Kashyap) देखील दिसत आहे. या ट्रेलरच्या सुरुवातीला नवाजुद्दीन हा एका ट्रान्सजेंडरच्या लूकमध्ये दिसतो. नवाजुद्दीननं हड्डी या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'सूड कधी इतका थंड दिसला आहे का? हड्डी येत आहे, सूडाची कथा तुमच्या समोर मांडण्यासाठी'
'हड्डी' ची स्टार कास्ट
नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अनुराग कश्यप यांच्यासोबतच हड्डी या चित्रपटामध्ये इला अरुण, मोहम्मद जीशान अय्यूब, सौरभ सचदेवा, श्रीधर दुबे, राजेश कुमार, विपिन शर्मा और सहर्ष शुक्ला या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.
View this post on Instagram
कधी रिलीज होणार हड्डी?
हड्डी हा चित्रपट 7 सप्टेंबर 2023 रोजी झी-5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अक्षत अजय शर्मा यांनी केले आहे, तर झी स्टुडिओनं या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हड्डी या चित्रपटात अॅक्शन, ड्रामा पहायला मिळणार आहे, असा अंदाज या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर लावला जाऊ शकतो.
View this post on Instagram
नवाजुद्दीन सिद्दीकीचे चित्रपट
नवाजुद्दीन सिद्दीकीच्या (Nawazuddin Siddiqui) गँग ऑफ वासेपूर, मंटो, ठाकरे, 'बजरंगी भाईजान' या चित्रपटांना आणि सेक्रेड गेम्स या वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळाली. नवाजुद्दीनच्या अभिनयाचं अनेक जण कौतुक करतात. काही दिवसांपूर्वी नवाजुद्दीन सिद्दीकीचा'टिकू वेड्स शेरू' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. आता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या हड्डी या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
संबंधित बातम्या