Haddi : हिरवी साडी, काजळ, लिपस्टिक, टिकली अन् झुमके...; अंगावर शहारे आणणारा नवाजुद्दीनचा लूक; 'हड्डी'चे पोस्टर आऊट
Nawazuddin Siddiqui : 'हड्डी' सिनेमात नवाजुद्दीन सिद्धीकी ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या नव्या लूकने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.
Nawazuddin Siddiqui plays transgender Role in Haddi : नवाजुद्दीन सिद्धीकी (Nawazuddin Siddiqui) गेल्या काही दिवसांपासून 'हड्डी' (Haddi) सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात नवाजुद्दीन ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकतेच या सिनेमाचे नवे पोस्टर आऊट झाले असून नवाजुद्दीनच्या लूकने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.
नवाजुद्दीनचा लूक काय आहे?
पोस्टरमधील हिरव्या रंगाची काठापदराची साडी, डोळ्यात काजळ, ओठावर गडद रंगाची लिपस्टिक, कपाळावर टिकली, कानात झुमके, हातात लाल-हिरव्या रंगाच्या बांगड्या आणि लांबलचक केस असणारा नवाजुद्दीनचा लूक लक्षवेधी ठरतो आहे. तसेच एका वेगळ्या नजरेने जगाकडे पाहताना नवाजुद्दीन दिसत आहे. नवाजुद्दीनचा हा अंगावर शहारे आणणारा लूक सिनेमाची उत्सुकता वाढवणारा आहे.
'हड्डी' हा सिनेमा ट्रान्सजेंडरच्या आयुष्यावर भाष्य करणारा आहे. या सिनेमात नवाजुद्दीने 80 खऱ्या ट्रान्सजेंडरसोबत काम केलं आहे. या सिनेमासंदर्भात नवाजुद्दीन म्हणाला,"ट्रान्सजेंडरसोबत काम करायला मिळणं हा माझा सन्मान आणि भाग्य आहे".
View this post on Instagram
'हड्डी' सिनेमात ट्रान्सजेंडरची भूमिका साकारताना आलेल्या अनुभवाविषयी नवाजुद्दीन म्हणाला,"हड्डी' सिनेमात खऱ्या ट्रान्सजेंडरसोबत काम करणं हा माझ्यासाठी एक वेगळाच अनुभव होता. खरेतर ही सन्मानाची गोष्ट आहे. या सिनेमाच्या माध्यमातून मला ट्रान्सजेंडर समुदाय समजता आला. तसेच त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या".
'हड्डी' या सिनेमाचे पोस्टर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. नवाजुद्दीनला एका नव्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी नवाजुद्दीन सज्ज आहे. याआधीदेखील या सिनेमातील नवाजुद्दीनला लूक आऊट झाला होता. त्यावेळी नेटकऱ्यांना अर्चना पूरण सिंहची आठवण झाली.
पुढील वर्षात 'हड्डी' प्रेक्षकांच्या भेटीला!
'हड्डी' हा बहुचर्चित सिनेमा पुढील वर्षात म्हणजेच 2023 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा अक्षय अजय शर्मा यांनी सांभाळली आहे. झी स्टूडियोज आणि आनंदिता स्टूडियोजच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात येणार आहे. नवाजुद्दीन नेहमीच वेगवेगळे प्रयोग करत असतो आणि त्याचे प्रयोग चाहत्यांना आवडतात. त्यामुळे 'हड्डी' सिनेमा चाहत्यांना आवडेल अशी नवाजुद्दीनला आशा आहे.
संबंधित बातम्या