एक्स्प्लोर
उदय चोप्रासोबत लग्नाबाबत नर्गिस फाक्री म्हणते...
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाक्री आणि कोणे एके काळी मोठ्या पडद्यावर झळकलेला अभिनेता उदय चोप्रा यांच्यातील प्रेम प्रकरणाच्या चर्चांना गेल्या वर्षी उधाण आलं होतं. नर्गिस आणि उदय पुन्हा एकदा मालदीवला ट्रीपला गेल्यामुळे दोघं विवाहबंधनात अडकल्याच्या अफवांना ऊत आला आहे. मात्र नर्गिसने या सगळ्या चर्चा उडवून लावल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी मीडियाने उदय चोप्रा आणि नर्गिस फाक्रीला एअरपोर्टवर एकत्र पाहिलं. त्यानंतर दोघांमध्ये पुन्हा काहीतरी शिजत असल्याच्या गॉसिप्सनी फेर धरला. मात्र नर्गिसने या चर्चांना छेद देत 'माझ्या लग्नाची सगळ्यांना फारच घाई झालेली दिसत्ये' अशा आशयाचं ट्वीट केलं आहे.
फिल्मफेअरने उदय-नर्गिस लग्न करणार असल्याची बातमी छापली. त्यावर चिडलेल्या नर्गिसने ट्विटरवरुनच त्याचा समाचार घेतला. 'अरे वा, तुम्हाला कथा रचण्यात भलताच रस दिसतोय. आता या अफवेला कोणी खतपाणी घातलं? माझं कोणाशी तरी लग्न झालेलं पाहण्यासाठी तुमचा जीव जातोय वाटतं.' असं ट्वीट नर्गिसने केलं.
उदय चोप्रा आणि नर्गिस फाक्रीचं व्हॉट्सअॅपवरुन ब्रेकअप?
गेल्या वर्षी नर्गिसची मानसिक अवस्था बरी नसल्याचं म्हटलं जात होतं. नर्गिसला उदयशी लग्न करण्याची इच्छा होती, मात्र उदयने तिची मागणी धुडकावल्याने तिला मानसिक त्रास झाला. त्यामुळे तिने देश सोडून अमेरिकेत काही काळ घालवणं पसंत केल्याचं म्हटलं गेलं. उदय चोप्राने मोहब्बते, धूम, मेरे यार की शादी है, नील एन निक्की यासारख्या 'यशराज फिल्म्स'च्या चित्रपटात भूमिका केल्या होत्या. यश चोप्रा यांचा सुपुत्र, प्रख्यात दिग्दर्शक आदित्य चोप्राचा धाकटा भाऊ आणि राणी मुखर्जीचा दीर असूनही उदय फारशी चमक दाखवू शकला नाही.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement