एक्स्प्लोर
Advertisement
19 व्या वर्षी लग्न, 3 मुलांची आई, घटस्फोटानंतर बनली शाहरुखची हिरोईन
मुंबई : शाहरुख खानच्या 'फॅन' सिनेमात मॉडेल आणि अभिनेत्री वलुश्चा डिसूझा रोमान्स करताना दिसतील. 33 वर्षीय वलुश्चा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. मनीष शर्मा दिग्दर्शित हा सिनेमा 15 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.
19 व्या वर्षात लग्न, 30 व्या वर्षी घटस्फोट...
- वलुश्चाने वयाच्या 19 व्या वर्षी लव्ह मॅरेज केलं होतं.
- वलुश्चा सुपरमॉडेल मार्क रॉबिन्सनसोबत फेब्रुवारी, 2002 विवाहबंधनात अडकली होती.
- वलुश्चा तीन मुलांची आई असून, शनेल, ब्रुकलिन, सिएना अशी त्यांची नावं आहेत.
- मात्र 2013 मध्ये वलुश्चा आणि मार्कचा घटस्फोट झाला.
अभिनेत्री बनण्यास कुटुंबीयांचा विरोध
- गोव्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या वलुश्चाच्या कुटुंबातील सर्वजण वकील आणि डॉक्टर आहेत. त्यामुळे तिनेही यातच करिअर करावं, अशी सगळ्यांची इच्छा होती.
- मात्र दहावीत असताना ती एक मोटिवेशनल लेक्चर ऐकायला गेली होती. सर्व विद्यार्थी इकोनॉमिक्स, साइकोलॉजी किंवा इतर विषयांबाबत प्रश्न विचारत होते. मात्र बॉलिवूडमध्ये कसं जावं, असा प्रश्न तिने विचारला. त्यावेळ सर्व विद्यार्थ्यांनी तिची थट्टा केली होती.
- त्यानंतर सोळाव्या वर्षीच तिने मॉडेलिंगला सुरुवात केली.
- तिने मॉडेलिंगमध्येच करिअर करण्याचा निर्णय घेतला आणि 2000 मध्ये मिस इंडियामध्ये भाग घेतला
- फॅशन इंडस्ट्रीमध्ये तिने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
निवडणूक
राजकारण
जॅाब माझा
Advertisement