एक्स्प्लोर

Renjusha Menon Found Dead: अभिनेत्रीचं वयाच्या 35 व्या वर्षी निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह

Renjusha Menon Found Dead: 35 वर्षीय अभिनेत्री रंजूषा मेनन ही तिरुअनंतपुरममधील (Thiruvananthapuram) तिच्या फ्लॅटमध्ये मृत अवस्थेत आढळली.

Renjusha Menon Found Dead: मल्याळम टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री रंजूषा मेनन (Renjusha Menon) ही तिच्या घरात मृतावस्थेत आढळून आली. रंजूषाच्या निधनानंतर तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. 35 वर्षीय  रंजूषा मेनन ही तिरुअनंतपुरममधील (Thiruvananthapuram) तिच्या फ्लॅटमध्ये मृत अवस्थेत आढळली. सोमवारी (30 ऑक्टोबर) सकाळी तिचा मृत्यू झालाय. रंजूषाच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

रंजूषा मेनन ही अपार्टमेंटमध्ये तिच्या कुटुंबासह राहत होती. श्रीकरियम ( Sreekariyam) पोलिसांनी रंजूषाच्या मृत्यूचा तपास सुरू केला आहे. सोमवारी (30 ऑक्टोबर) सकाळी रंजूषाची खोली बराच काळ बंद असल्याने कुटुंबीयांना संशय आला. नंतर तिच्या रुमचा दरवाजा तोडल्यानंतर ती मृत अवस्थेत आढळून आली. रिपोर्टनुसार, रंजूषा मेननचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी नेण्यात येईल.

चित्रपट आणि मालिकांमध्ये केलं काम 

रंजूषा मेनननं अनेक मल्याळम चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं. तिनं चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका साकारली.रंजूषानं  'सेलिब्रिटी किचन मॅजिक' या  सेलिब्रिटी कुकरी शोमध्ये  स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता. सिटी ऑफ गॉड (City of God) आणि मेरीकुंडोरू कुंजाडू ( Marykkundoru Kunjaadu) या चित्रपटांमध्ये देखील तिनं काम केलं.

रंजूषा ही सोशल मीडियावर सक्रिय होती. ती तिच्या सहकलाकारांसोबतचे रिल्स सोशल मीडियावर शेअर करत होती. 29 ऑक्टोबर रोजी तिने एक रिल देखील इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. ते रिल रंजूषाची सोशल मीडियावरील शेवटची पोस्ट ठरली.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sreedevi Anil (@anil_sreedevi)

रंजूषा ही सोशल मीडियावर मजेशीर रिल्स तसेच सहकलाकारांसोबत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत होती. तिला इन्स्टाग्रामवर 6,652 फॉलोवर्स आहेत. तसेच रंजूषा ही तिच्या विविध लूक्समधील फोटो देखील सोशल मीडियावर शेअर करत होती. रंजूषाच्या सोशल मीडियावरील फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळत होती. रंजूषाच्या निधनानंतर आता मल्याळम चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Renjusha Menon (@renjusha_menon)

इतर महत्वाच्या बातम्या:

Matthew Perry Passed Away : 'Friends' स्टार अभिनेता मॅथ्यू पेरीचे निधन; राहत्या घरी आढळला मृतदेह

 

महत्त्वाच्या बातम्या

Imran Khan Stepfather Raj Zutshi Bollywood Actor: ज्या इमरान खानला देश सोडायला सांगितलंय, त्याचे सावत्र वडील बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते; 'धुरंधर'मध्ये साकारलीय महत्त्वाची भूमिका, ओळखलं का कोण?
ज्या इमरान खानला देश सोडायला सांगितलंय, त्याचे सावत्र वडील बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते; 'धुरंधर'मध्ये साकारलीय महत्त्वाची भूमिका
Nana Patekar Son Malhar On Tanushree Dutta Allegation: मोठी बातमी : तनुश्री दत्ताला मल्हार पाटेकरचं उत्तर, नानांच्या मृत्यूवर बरळणाऱ्या अभिनेत्रीला म्हणाला...
मोठी बातमी : तनुश्री दत्ताला मल्हार पाटेकरचं उत्तर, नानांच्या मृत्यूवर बरळणाऱ्या अभिनेत्रीला म्हणाला...
BMC Action At Ajay Devgn Bungalow: अजय देवगणच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर हातोडा; BMC चे अधिकारी पोहोचले, भिंती, खिडक्या धडाधड तोडल्या, नेमकं प्रकरण काय?
अजय देवगणच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर हातोडा; BMC चे अधिकारी पोहोचले, भिंती, खिडक्या धडाधड तोडल्या, नेमकं प्रकरण काय?
Koffee With Karan 9 Salman Khan: 'माझं आयुष्य माझ्यासोबतच कबरीमध्ये दफन होईल...'; सलमान खानच्या वक्तव्यानं चाहते हादरले, नेमकं काय म्हणाला?
'माझं आयुष्य माझ्यासोबतच कबरीमध्ये दफन होईल...'; सलमान खानच्या वक्तव्यानं चाहते हादरले, नेमकं काय म्हणाला?

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
Abhijeet Dipke: सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
Gokul Election: कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा थेट व्हिडिओ व्हायरल
कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा व्हिडिओ व्हायरल
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला फोनवर धमकी,
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला फोनवर धमकी, "तुझा नेक्स्ट गेम" म्हणत पाठवला मेसेज, कुटुंबीय भीतीच्या छायेत
UP News : एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा
सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा
Embed widget