(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Matthew Perry Passed Away : 'Friends' स्टार अभिनेता मॅथ्यू पेरीचे निधन; राहत्या घरी आढळला मृतदेह
Matthew Perry : 'Friends' स्टार अभिनेता मॅथ्यू पेरीचा मृतदेह राहत्या घरी जकुजीमध्ये बुडालेल्या अवस्थेत आढळला आहे.
Matthew Perry : नव्वदीच्या दशकातील प्रसिद्ध अमेरिकन टीवी शो फ्रेंड्समधील (Friends) चँडलरची भूमिका करणारा अभिनेता मॅथ्यू पेरीचे (Matthew Perry) निधन झाले आहे. अभिनेता मॅथ्यू पेरीचा मृतदेह त्याच्या राहत्या घरी आढळला आहे. मॅथ्यूचा (Matthew Perry Passed Away) मृतदेह घरातील जकुजीमधे बुडालेल्या अवस्थेत आढळला आहे. मात्र मृत्युचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
मॅथ्यू पेरीने वयाच्या 54 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. लास वेगास येथील राहत्या घरी अभिनेत्याचा मृतदेह बुडालेल्या अवस्थेत आढळला आहे. 'फ्रेंड्स' ही लोकप्रिय मालिका असून या मालिकेच्या माध्यमातून मॅथ्यू पेरी घराघरांत पोहोचला. आता अभिनेत्याचे निधन झाल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते शोक व्यक्त करत आहेत.
Actor Matthew Perry, who gained fame in the 1990s for his starring role in the hit US television comedy 'Friends', was found dead at age 54 on Saturday in a hot tub at a Los Angeles-area home, reports Reuters quoting LA Times
— ANI (@ANI) October 29, 2023
मॅथ्यू पेरी कोण आहे? (Who is Matthew Perry)
मॅथ्यू पेरी हा हॉलिवूडचा (Hollywood Actor) लोकप्रिय अभिनेता आहे. मॅथ्यू पेरीचा जन्म 19 ऑगस्ट 1969 रोजी विलियमस्टाउन येथे झाला. त्याची आई सुजैन मैरी मॉरिसन पत्रकार असून वडील जॉन बेनेट पेरी हेदेखील हॉलिवूडचे अभिनेते होते. पण मॅथ्यू पेरीचे आईवडील विभक्त झाले आहेत. अभिनेत्याच्या आईने पत्रकार कीथ मॉरिसनसोबत दुसरं लग्न केलं आहे.
मॅथ्यू पेरीच्या गाजलेल्या कलाकृतींबद्दल जाणून घ्या... (Matthew Perry Movies Serials)
अभिनेता असण्यासोबत तो विनोदी नट आणि निर्माताही आहे. 'फ्रेंड्स' (Friends) या मालिकेमुळे मॅथ्यू पेरी जागतिक पातळीवर लोकप्रिय झाला. मॅथ्यू पेरीने अनेक सिनेमांत काम केलं आहे. यात 'फूल्स रश इन', 'ऑलमोस्ट हीरोज', 'द होल नाइन यार्ड्स', '17 अगेन' आणि 'द रॉन क्लार्क स्टोरी' अशा अनेक सिनेमांचा समावेश आहे.
'मिस्टर सनशाइन' या मालिकेचा मॅथ्यू पेरी सह-निर्माता, सह-लेखक, कार्यकारी निर्माता होता. तसेच या मालिकेत तो मुख्य भूमिकेतही होता. त्यानंतर अभिनेत्याने 'गो ऑन' मालिकेत रयान किंगच्या भूमिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्यानंतर त्याने 'द ऑड कपल' या मालिकेत ऑस्कर मॅडिसनची भूमिका साकारली. एकंदरीकच अनेक गाजलेल्या मालिका आणि सिनेमांमध्ये मॅथ्यूने काम केलं आहे.
संबंधित बातम्या