एक्स्प्लोर

चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही..., सलील कुलकर्णींचे आता जेष्ठ मंडळींसाठी खास कार्यक्रम

Salil Kulkarni : 'आयुष्यावर बोलू काही' फेम सलील कुलकर्णीने ज्येष्ठ मंडळींसाठी एक खास निर्णय घेतला आहे.

Salil Kulkarni Show : सलील कुलकर्णीने (Salil Kulkarni) 'आयुष्यावर बोलू काही' या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवले आहे. गायक, संगीतकार सलील कुलकर्णीने त्याच्या संगीताच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले आहे. सलीलच्या गाण्याचा, संगीताचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. कोरोनामुळे मात्र प्रेक्षकांना सलीलच्या कार्यक्रमांपासून दूर राहावे लागले होते. सलीलच्या कार्यक्रमांची प्रेक्षकदेखील प्रतीक्षा करत होते. अशातच प्रेक्षकांचा विचार करत सलील कुलकर्णीने एक खास निर्णय घेतला आहे. सलील कुलकर्णी ज्येष्ठ मंडळींना आनंदाचे संगीतमय क्षणाचा आनंद देणार आहे. 

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सिने-नाट्यगृहात जाऊन कार्यक्रम बघणे हे ज्येष्ठ नागरिकांसाठी अवघड आहे. हीच बाब लक्षात घेऊन सलीलने ज्येष्ठ मंडळींसाठी त्यांच्या घरी जाऊन कार्यक्रम करण्याचा अनोखा निर्णय घेतला आहे. त्या संदर्भातील माहिती देत सलीलने फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे.

त्या पोस्टमध्ये सलीलने लिहिले आहे, "आपल्याकडे अनेक वर्ष गाण्याच्या उत्तमोत्तम मैफिली ऐकणारे अनेक रसिक आहेत. त्यांच्यापैकी काही जणं आता वयोमानानुसार घराबाहेर पडू शकत नाहीत. अगदी काल -परवा सुद्धा कार्यक्रमांत भेटणारे अनेक रसिक बोलता बोलता सांगत होते की, आमचे आई-बाबा, मावशी, काका पूर्वी तुमच्या मैफिलीला नक्की यायचे. पण आता ते थकले आहेत किंवा आजारी आहेत. त्यामुळे त्यांना घराबाहेर पडता येत नाही. प्रत्यक्ष (लाईव्ह ) गाणं ऐकणं या गोष्टीचे महत्वं किती आहे हे आपल्या सगळ्यानांच आताच्या काळाने दाखवून दिले आहे. त्यामुळे या ज्येष्ठ मंडळींना नाट्यगृहापर्यंत येता येणार नाही. पण मी त्यांना भेटून अर्धा तास गाणी नक्की ऐकवू शकतो".

Satyameva Jayate 2 Song Kusu Kusu: नोरा फतेहीच्या बेली डान्सने प्रेक्षकांना केले थक्क

सलीलने पुढे लिहिले आहे, "त्यामुळे डिसेंबरपासून ज्या घरात असे रसिक आजी आजोबा आहेत ज्यांना आता कार्यक्रमाला येता येत नाही त्यांच्या घरी येऊन त्यांची सेवा म्हणून, त्यांना भेट म्हणून काही गाणी ऐकवायची इच्छा आहे. महिन्यातून किमान एखाद्या जोडप्याला किंवा ग्रुपला असा आनंद देऊ शकलो तर खूप समाधान मिळेल. ज्यांना असं मनापासून वाटतं की माझ्या घरातल्या ज्येष्ठ मंडळींना गाणी ऐकायची ओढ आहे आणि त्यांना खरोखर शक्य नाहीत्यांनी musicdirectorsaleel@gmail.com 
वर संपर्क साधा."

सलीलच्या अनोख्या निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे. अनेक कलाकार मंडळीदेखील त्याच्या निर्णयाचं कौतुक करताना दिसून येत आहेत. ज्येष्ठ मंडळींसाठी सलीलचा हा निर्णय नक्कीच आनंदाचे संगीतमय क्षण देणारा ठरणार आहे.

Ranbir-Alia Wedding: पुढील वर्षी रणबीर आणि आलिया अडकणार लग्नाच्या बेडीत

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Video : 'माझ्याकडं खूप व्हिडिओ आहेत हं!' शिवसेना-मनसे युतीची घोषणा करताच लाव रे तो व्हिडिओ म्हणणाऱ्या राज ठाकरेंचा सूचक इशारा नेमका कोणाला?
Video : 'माझ्याकडं खूप व्हिडिओ आहेत हं!' शिवसेना-मनसे युतीची घोषणा करताच लाव रे तो व्हिडिओ म्हणणाऱ्या राज ठाकरेंचा सूचक इशारा नेमका कोणाला?
Raj Thackeray Alliance Announced : शिवसेना-मनसेची युती झाली हे आम्ही जाहीर करतोय
Raj Thackeray Alliance Announced : शिवसेना-मनसेची युती झाली हे आम्ही जाहीर करतोय
BMC Election 2026: मोठी बातमी: राज ठाकरे-उद्धव ठाकरेंच्या युतीच्या घोषणेपूर्वीच ठाकरे गटाचा पहिला उमेदवार ठरला, मनसे-शिवसेना युती 130 जागा जिंकण्याचा अंदाज, किशोरी पेडणेकरांचा दावा
मोठी बातमी: राज ठाकरे-उद्धव ठाकरेंच्या युतीच्या घोषणेपूर्वीच ठाकरे गटाचा पहिला उमेदवार ठरला, मनसे-शिवसेना युती 130 जागा जिंकण्याचा अंदाज, किशोरी पेडणेकरांचा दावा
Raj Thackeray And Uddhav Thackeray Alliance: उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंच्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेतील 10 महत्वाचे मुद्दे, ठाकरे बंधूंनी सगळं सांगितलं!
उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंच्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेतील 10 महत्वाचे मुद्दे, ठाकरे बंधूंनी सगळं सांगितलं!

व्हिडीओ

Thackeray Brohters Yuti : शिवसेना-मनसे युती झाली हे आम्ही जाहीर करतोय, राज ठाकरेंची घोषणा
Raj Thackeray Uddhav Thackeray Yuti Full PC :शिवसेना-मनसेची युती झाली हे आम्ही जाहीर करतोय, ठाकरेंची घोषणा
Uddhav Thackeray Matoshri : उद्धव ठाकरे दादरच्या दिशेने रवाना, बाळासाहेबांना अभिवादन करणार
Sudhir Mungantiwar : जादू झाली, नाराजी गेली; सुधीरभाऊंना पक्ष ताकद कशी देणार? Special Report
Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video : 'माझ्याकडं खूप व्हिडिओ आहेत हं!' शिवसेना-मनसे युतीची घोषणा करताच लाव रे तो व्हिडिओ म्हणणाऱ्या राज ठाकरेंचा सूचक इशारा नेमका कोणाला?
Video : 'माझ्याकडं खूप व्हिडिओ आहेत हं!' शिवसेना-मनसे युतीची घोषणा करताच लाव रे तो व्हिडिओ म्हणणाऱ्या राज ठाकरेंचा सूचक इशारा नेमका कोणाला?
Raj Thackeray Alliance Announced : शिवसेना-मनसेची युती झाली हे आम्ही जाहीर करतोय
Raj Thackeray Alliance Announced : शिवसेना-मनसेची युती झाली हे आम्ही जाहीर करतोय
BMC Election 2026: मोठी बातमी: राज ठाकरे-उद्धव ठाकरेंच्या युतीच्या घोषणेपूर्वीच ठाकरे गटाचा पहिला उमेदवार ठरला, मनसे-शिवसेना युती 130 जागा जिंकण्याचा अंदाज, किशोरी पेडणेकरांचा दावा
मोठी बातमी: राज ठाकरे-उद्धव ठाकरेंच्या युतीच्या घोषणेपूर्वीच ठाकरे गटाचा पहिला उमेदवार ठरला, मनसे-शिवसेना युती 130 जागा जिंकण्याचा अंदाज, किशोरी पेडणेकरांचा दावा
Raj Thackeray And Uddhav Thackeray Alliance: उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंच्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेतील 10 महत्वाचे मुद्दे, ठाकरे बंधूंनी सगळं सांगितलं!
उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंच्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेतील 10 महत्वाचे मुद्दे, ठाकरे बंधूंनी सगळं सांगितलं!
Supriya Sule on Prashant Jagtap: सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, 'समाजात काम करताना नाराजी...'
सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, 'समाजात काम करताना नाराजी...'
Raj Thackeray: ठाकरे बंधूंकडून युतीची घोषणा, मराठीचा मुद्दा; भाजपची पहिली प्रतिक्रिया, मंत्री महोदयांचा कवितेतूनही टोला
ठाकरे बंधूंकडून युतीची घोषणा, मराठीचा मुद्दा; भाजपची पहिली प्रतिक्रिया, मंत्री महोदयांचा कवितेतूनही टोला
Raj Thackeray: कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठाय; आमची युती झालीय हे आम्ही जाहीर करतोय, मुंबईत महापौर मराठीच होणार आणि आमचाच होणार! उद्धव साक्षीने राज ठाकरेंची 'मनसे' गर्जना
कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठाय; आमची युती झालीय हे आम्ही जाहीर करतोय, मुंबईत महापौर मराठीच होणार आणि आमचाच होणार! उद्धव साक्षीने राज ठाकरेंची 'मनसे' गर्जना
आमचं ठरलंय नंतर आता कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं! सतेज पाटलांकडून हलगी तापवायला सुरुवात, प्रचारात 100 कोटींचे रस्तेच केंद्रस्थानी राहण्याची चिन्हे
आमचं ठरलंय नंतर आता कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं! सतेज पाटलांकडून हलगी तापवायला सुरुवात, प्रचारात 100 कोटींचे रस्तेच केंद्रस्थानी राहण्याची चिन्हे
Embed widget