Satyameva Jayate 2 Song Kusu Kusu: नोरा फतेहीच्या बेली डान्सने प्रेक्षकांना केले थक्क
नोरा फतेहीने नृत्याद्वारे प्रेक्षकांना पुन्हा एकदा थिरकावले आहे. एकापेक्षा एक बेली डान्सच्या स्टेप्सवर प्रेक्षकांना थक्क केले आहे.
Nora Fatehi Kusu Kusu Song: सत्यमेव जयते (Satyamev Jayate) सिनेमातील दिलबर दिलबर (Dilbar Dilbar) गाण्यावर नृत्य केल्यानंतर नोरा आता सत्यमेव जयते 2 (Satyamev Jayate 2) सिनेमातील आयटम सॉंगवर थिरकताना दिसून येत आहे. नुकतेच नोरावर चित्रित झालेले 'कुसु कुसु' हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्यात नोरा अभिनेत्री असून सिल्वर पोशाखात शूटिंग करताना दिसून येत आहे.
नोराने पुन्हा एकदा या गाण्याच्या माध्यामातून प्रेक्षकांना वेड लावले आहे. या गाण्यात नोरा बेली डान्स करताना दिसून येत आहे. हे गाणे प्रदर्शित होताच गाण्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. सोशल मीडियावरदेखील या गाण्यासाठी नोराचे कौतुक होत आहे. नोराच्या या गाण्यावर चाहते कमेंट्स करत आहेत. एका चाहत्याने कमेंट्समध्ये लिहिले आहे,"नोरामुळे हेलनची झलक पाहायला मिळत आहे. नोरा या काळातील हेलन आहे. नोराचे हे गाणे बघून हेलनलादेखील अभिमान वाटेल". तर दुसऱ्या चाहत्याने लिहिले आहे,"नोरा तिच्या नृत्याने तिच्या प्रेमात पाडायला भाग पाडत असते". या गाण्यात जॉन अब्राहमचीदेखील झलक पाहायला मिळते. नोरा डान्स करत असलेला जॉनचा हा चौथा सिनेमा आहे.
Ranbir-Alia Wedding: पुढील वर्षी रणबीर आणि आलिया अडकणार लग्नाच्या बेडीत
नोराने जॉनच्या 'रॉकी हॅंडसम' सिनेमातील 'रॉक द पार्टी', 'सत्यमेव जयते' सिनेमातील 'दिलबर दिलबर' आणि 'बाटला हाउस' सिनेमातील 'ओ साकी साकी' गाण्यावर आतापर्यंत नृत्य केले आहे. 'दिलबर-दिलबर' आणि 'साकी साकी' गाण्यामुळे नोरा खूपच लोकप्रिय झाली होती. नोराचे आगामी 'कुसु कुसु' गाणे जहराह खान आणि देव नेगीने गायले आहे. 'सत्यमेव जयते 2' सिनेमा 26 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.