Hiccups And Hookups Season 2 : 'हिक्कप्स ॲण्ड हुकअप्स'चा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, लारा दत्ता आणि प्रतीक बब्बर दिसणार मुख्य भूमिकेत
Hiccups And Hookups Season 2 : हिक्कप्स ॲण्ड हुकअप्सच्या दुसऱ्या भागात लारा दत्ता आणि प्रतीक बब्बर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
Hiccups And Hookups Season 2 : वासू, अखिल आणि के प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा एकदा येत आहेत. लवकरच 'हिक्कप्स ॲण्ड हुकअप्स'चा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीझनमध्ये लारा दत्ता आणि प्रतीक बब्बर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. पहिल्या सीझनला जागतिक स्तरावर प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता.
प्रेक्षक गेले अनेक दिवस दुसऱ्या सीझनची प्रतीक्षा करत होते. पण लवकरच या सीरिजच्या चाहत्यांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. लारा दत्ता आणि प्रतीक
बब्बरची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडणार आहे. तर हा सीझन प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारादेखील ठरणार आहे.
वसुधाची भूमिका करणारी लारा दत्ता म्हणाली,"सीझन 1 ला प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. प्रेक्षकांसह आम्हीदेखील या सीझनच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट बघत आहोत. या सीझनमध्ये अनेक रंजक वळणे आहेत".
View this post on Instagram
अखिलची भूमिका करणारा प्रतीक बब्बर म्हणाला, 'हिक्कप्स ॲण्ड हुकअप्स'च्या दुसऱ्या सीझनची मी उत्साहाने वाट बघत आहे. या सीझनमध्ये प्रेक्षकांना नाट्य आणि अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. पहिल्या सीझनचे खूप कौतुक झाले होते. त्यामुळे दुसरा सीझनदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडेल, अशी मला आशा आहे.
संबंधित बातम्या
Raj Kundra : राज कुंद्राची इन्स्टाग्रामवर 'घर वापसी'; 'या' नावाने उघडलं अकाऊंट
Singers Per Song Charges : सोनू निगम ते अरिजित सिंग, एका गाण्यासाठी गायक आकारतात ‘इतके’ मानधन!
'Rudra : The Edge Of Darkness' ट्रेलर प्रदर्शित, अजय देवगण दिसणार पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha