एक्स्प्लोर

Kranti Redkar: मी आणि समीर जन्मानं हिंदूच, कधीही धर्म बदलला नाही : क्रांती रेडकर

नवाब मलिकांनी समीर वानखेडेंवर साधलेल्या निशाण्यावर क्रांती रेडकरने समीरसोबतचे लग्नाचे फोटो शेअर करत अप्रत्यक्षपणे उत्तर दिलेलं आहे.

Kranti Redkar Wankhede Share marriage photo : शाहरुखचा मुलगा आर्यन खानच्या (Aryan Khan) ड्रग्ज प्रकरणाचा तपास करणारे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) सध्या चर्चेत आहेत. वानखेडेंमुळे त्यांची पत्नी आणि मराठी मनोरंजन क्षेत्रात अभिनयाचा ठसा उमटवणारी क्रांती रेडकरदेखील चर्चेत आहे. समीर वानखेडेंवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आरोप केले आहेत. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी समीर वानखेडेंचे मॅरेज सर्टिफिकेट ट्विटरवर पोस्ट केलं होतं. या फोटोवर नवाब मलिक यांनी पहचान कौन? असं कॅप्शन दिलेलं. त्यावर क्रांती रेडकरने पती समीर यांच्यासोबतचे लग्नाचे फोटो शेअर करत नवाब मलिक यांना अप्रत्यक्षपणे उत्तर दिलं आहे.

नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवर निशाणा साधत फ्रॉडला इथून सुरुवात होते असं म्हटले होतं. नवाब मलिकांनी शेअर केलेल्या मॅरेज सर्टिफिकेटच्या फोटोमध्ये वानखेडे यांच्या वडिलांचं नाव 'दाऊद के वानखेडे' असं असल्याचं दिसत आहे. तर त्यांच्या आईचं नाव 'झहीदा' असल्याचं यामध्ये दिसत आहे. नवाब मलिक यांनी वानखेडे यांचा आणखी फोटो पोस्ट केला आहे. तो त्यांच्या पहिल्या लग्नातील फोटो असल्याचं दिसत आहे. या फोटोवर नवाब मलिक यांनी पहचान कौन? असं कॅप्शन दिलं आहे.

क्रांती रेडकरने नबाव मलिक यांना अप्रत्यक्षपणे उत्तर दिलं आहे. क्रांती ट्वीट करत म्हणाली, मी आणि समीर जन्मानं हिंदूच, कधीही धर्म बदलला नाही." एकीकडे क्रांती रेडकरच्या फोटोंवर चाहते सत्यमेव जयते अशा प्रकरच्या कमेंट्स करत तिला सकारात्मक उर्जा देत आहेत. तर अनेकांनी तिच्यावर निशाणादेखील साधला आहे. हिंदू दामपत्याचा मुलगा मुस्लिम कशा अशा चर्चादेखील सोशल मीडियावर होताना दिसत आहेत.

नवाब मलिक म्हणतात, समीर वानखेडेंचा फ्रॉड इथून सुरु होतो, पहिल्या लग्नातील फोटोही व्हायरल 

समीर वानखेडे यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. तसेच त्यांनी "आपण न्यायालयात उत्तर देऊ",असं म्हटलं आहे. दरम्यान समीर वानखेडेंची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरनेदेखील समीर यांच्यासोबतचे लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत. 

Cruise Drugs: मुस्लिम जोडप्याचा मुलगा हिंदू कसा ? समीर वानखेडेंबाबत नवाब मलिक यांचा सवाल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2024 | शनिवार
Raj Thackeray: संघाच्या कामाने मला अचंबित केलंय, एखाद्या संघटनेने 100 वर्षे काम करणं सोपं नाही: राज ठाकरे
संघाच्या कामाने मला अचंबित केलंय, एखाद्या संघटनेने 100 वर्षे काम करणं सोपं नाही: राज ठाकरे
Samarjeetsinh Ghatge on Hasan Mushrif : निष्ठा विकल्याने झोप येत नाही, कागलचे नाव बदनाम करण्याचा ठेका घेतला; समरजित घाटगेंचा हसन मुश्रीफांवर जोरदार पलटवार
निष्ठा विकल्याने झोप येत नाही, कागलचे नाव बदनाम करण्याचा ठेका घेतला; समरजित घाटगेंचा हसन मुश्रीफांवर जोरदार पलटवार
Video : बिग बॉसने तुला कसं बोलवलं?; अजित पवारांचे बरेच प्रश्न, सूरजचं उत्तर ऐकून दादा पोट धरुन हसले
Video : बिग बॉसने तुला कसं बोलवलं?; अजित पवारांचे बरेच प्रश्न, सूरजचं उत्तर ऐकून दादा पोट धरुन हसले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anil Desai On Aaditya Thackeray Speech : दसरा मेळाव्यात आदित्य ठाकरे पहिल्यांदा भाषण करणारSuraj Chavan Meet Ajit Pawar : बिग बॉस विजेता सूरज चव्हाणने घेतली अजित पवार यांच्या भेटीलाABP Majha Headlines : 5 PM : 12 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde Shiv Sena Dasara Melava 2024 : आझाद मैदानावर एकनाथ शिंदेंच्या मेळाव्याची जय्यत तयारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2024 | शनिवार
Raj Thackeray: संघाच्या कामाने मला अचंबित केलंय, एखाद्या संघटनेने 100 वर्षे काम करणं सोपं नाही: राज ठाकरे
संघाच्या कामाने मला अचंबित केलंय, एखाद्या संघटनेने 100 वर्षे काम करणं सोपं नाही: राज ठाकरे
Samarjeetsinh Ghatge on Hasan Mushrif : निष्ठा विकल्याने झोप येत नाही, कागलचे नाव बदनाम करण्याचा ठेका घेतला; समरजित घाटगेंचा हसन मुश्रीफांवर जोरदार पलटवार
निष्ठा विकल्याने झोप येत नाही, कागलचे नाव बदनाम करण्याचा ठेका घेतला; समरजित घाटगेंचा हसन मुश्रीफांवर जोरदार पलटवार
Video : बिग बॉसने तुला कसं बोलवलं?; अजित पवारांचे बरेच प्रश्न, सूरजचं उत्तर ऐकून दादा पोट धरुन हसले
Video : बिग बॉसने तुला कसं बोलवलं?; अजित पवारांचे बरेच प्रश्न, सूरजचं उत्तर ऐकून दादा पोट धरुन हसले
Konkan Sea Bridge: विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी कोकणातील 7 पूलांचे भूमिपूजन, 8000 कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प
विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी कोकणातील 7 पूलांचे भूमिपूजन, 8000 कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प
Congress Action: अजित पवारांच्या पक्षात जाण्याच्या चर्चा असलेल्या 'त्या' आमदारावर काँग्रेसची कारवाई! सहा वर्षांसाठी केलं निलंबित, काय आहे प्रकरण?
अजित पवारांच्या पक्षात जाण्याच्या चर्चा असलेल्या 'त्या' आमदारावर काँग्रेसची कारवाई! सहा वर्षांसाठी केलं निलंबित, काय आहे प्रकरण?
Dasara Melava 2024 : भगवानगडावर पंकजा मुंडे की नारायण गडावर मनोज जरांगे पाटील? कोणाच्या दसरा मेळाव्याला सर्वाधिक गर्दी?
भगवानगडावर पंकजा मुंडे की नारायण गडावर मनोज जरांगे पाटील? कोणाच्या दसरा मेळाव्याला सर्वाधिक गर्दी?
Nashik Crime : हत्याराचा धाक दाखवून मित्राला बेदम मारहाण, वाचवायला गेलेल्या भावाच्या डोक्यात कोयत्याने केला वार, नाशिकमध्ये खळबळ
हत्याराचा धाक दाखवून मित्राला बेदम मारहाण, वाचवायला गेलेल्या भावाच्या डोक्यात कोयत्याने केला वार, नाशिकमध्ये खळबळ
Embed widget