नवाब मलिक म्हणतात, समीर वानखेडेंचा फ्रॉड इथून सुरु होतो, पहिल्या लग्नातील फोटोही व्हायरल
Mumbai Drug Case : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात दररोज नवनवीन खळबळजनक खुलासे होत आहेत. आता समीर वानखेडे यांचा एक फोटो व्हायरल होत आहे.
Mumbai Drug Case : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा तपास करणारे मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या कारवाईवर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी वारंवार आक्षेप घेत पुरावे सादर केले आहेत. या प्रकरणात पंच असणारे प्रभाकर साईल यांच्या गौप्यस्फोटानंतर या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं होतं. साईल यांच्या आरोपानंतर आता नवाब मलिक यांनी ट्विटरवरुन वानखेडे यांच्यावर पुन्हा निशाणा साधला आहे. नवाब मलिक यांनी ट्विट करत समीर दाऊद वानखेडे यांचं फ्रॉड इथून सुरुवात होतेय असं म्हटलेय. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचं मॅरेज सर्टिफिकेट ट्विटरवर पोस्ट केलं आहे. यामध्ये वानखेडे यांच्या वडिलांचं नाव दाऊद के वानखेडे असं असल्याचं दिसत आहे. तर त्यांच्या आईचं नाव झहीदा असल्याचं यामध्ये दिसत आहे. नवाब मलिक यांनी वानखेडे यांचा आणखी फोटो पोस्ट केला आहे. तो त्यांच्या पहिल्या लग्नातील फोटो असल्याचं दिसत आहे. या फोटोवर नवाब मलिक यांनी पहचान कौन? असं कॅप्शन दिलेय. एनसीबीनं केलेल्या कारवाईवर नवाब मलिक यांनी वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अनेक पुरावे सादर करत नवाब मलिक यांनी आर्यन खान अमली पदार्थ कारवाई कशी बोगस आहे आणि आघाडी सरकारला कसं बदनाम केलं जातंय स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.
Sameer Dawood Wankhede का यहां से शुरू हुआ फर्जीवाड़ा pic.twitter.com/rjdOkPs4T6
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 25, 2021
Pehchan kaon? pic.twitter.com/S3BOL4Luc8
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 25, 2021
नवाब मलिक यांच्या आरोपांनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही म्हटलं की, मलिक इतका विषय मांडतायत त्यातून दिसतंय की काहीतरी गडबड आहे. त्यातच प्रभाकर साईल यांच्या गौप्यस्फोटानंतर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ झाली. यावर संजय राऊत यांनी 'थांबा आणि आणखी पाहा' असं ट्विट केलं आहे. राऊतांच्या ट्विटला रिप्लाय देताना एका नेटकऱ्यानं वानखेडे यांच्या लग्नातील पहिला फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो आणि मलिकांनी क्रॉप करुन टाकलेला फोटो सारखाच दिसत आहे.
समीर दाऊत वानखेडे भक्तांचे दाजी pic.twitter.com/h328Cf9xzm
— yogesh sawant (@yogi_9696) October 25, 2021
प्रभाकर सईल यांनी काय केलाय दावा?
प्रभाकरने आपल्या प्रतिज्ञापत्रात सॅम डिसूझा नावाच्या व्यक्तीचा उल्लेख केला आहे. प्रभाकरच्या म्हणण्यानुसार, तो एनसीबी कार्यालयाबाहेर सॅम डिसूझाला भेटला. त्यावेळी ते के.पी.गोसावींना भेटायला आले होते. लोअर परळ जवळील बिग बाजार जवळ NCB कार्यालयातून दोघेही आपापल्या कारमध्ये पोहोचले. त्याने शपथपत्रात दावा केलाय की गोसावी हे सॅम नावाच्या व्यक्तीशी 25 कोटी रुपयांनी सुरुवात करुन 18 कोटींमध्ये फिक्स करण्यासाठी बोलत होते. ते समीर वानखेडे यांना 8 कोटी रुपये देण्याबाबतही बोलले आहे.