एक्स्प्लोर
'नॅशनल क्रश' प्रिया वॉरियरचा व्हॅलेंटाईन प्लॅन काय? जाणून घ्या
व्हॅलेंटाईन डेला प्रियाचा प्लॅन काय, याबद्दल जाणून घेण्यास सर्वच जण उत्सुक आहेत.
मुंबई : व्हॅलेंटाईन्स डे अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे आणि बहुतांश सिंगल तरुणांना त्यांची लेटेस्ट क्रश सापडली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत डोळा मारणारी ही तरुणी देशभरातील लाखो तरुणांच्या हृदयाची धडकन झाली आहे. 'ओरु अदार लव्ह' या मल्ल्याळम चित्रपटातून पदार्पण करणारी ही नवोदित अभिनेत्री आहे प्रिया प्रकाश वॉरियर.
प्रियाच्या प्रत्येक गोष्टीची सोशल मीडियावर चर्चा आहे. उद्या 14 फेब्रुवारीला जगभरात व्हॅलेंटाईन डे साजरा केला जाणार आहे. त्यामुळे प्रियाचा व्हॅलेंटाईन कोण, याची चर्चा तर होणारच. व्हॅलेंटाईन डेला प्रियाचा प्लॅन काय, याबद्दल जाणून घेण्यास सर्वच जण उत्सुक आहेत.
प्रिया या व्हॅलेंटाईन डेला अत्यंत व्यस्त राहणार आहे. आपल्या आयुष्यात अजून तरी कुणी ‘स्पेशल वन’ नाही, असं तिने हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
अभिनेत्री बनण्याचं स्वप्न आणि अभ्यास ही दोनच उद्दीष्ट सध्या आहेत. व्हॅलेंटाईन डेलाही कॉलेजला जावं लागेल, कारण कॉलेजला हजेरी लावणं गरजेचं आहे, असं प्रियान सांगितलं.
गेल्या आठवड्याभरापासून प्रिया सोशल मीडिया सेन्सेशन ठरली आहे. शाळेच्या गॅदरिंगमध्ये एक विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थिनीकडे रोखून बघतो. दोघांमध्ये नजरानजर होते आणि 'आँखो ही आँखो में बात हो गई' असा काहीसा प्रकार घडतो. या तरुणीने नजरेने सोडलेल्या बाणाने तिचा मित्र तर घायाळ होतोच, मात्र हा व्हिडिओ पाहणारे नेटिझन्सही गार झाले आहेत.
प्रिया अवघी 18 वर्षांची आहे. केरळातील थ्रिसूरमधल्या विमला कॉलेजमध्ये ती बीकॉमचं शिक्षण घेत आहे.
संबंधित बातमी :
डोळा मारणारी 'व्हायरल गर्ल' प्रिया आहे तरी कोण?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
राजकारण
राजकारण
क्राईम
Advertisement