हुबेहुब कियारा अडवाणीसारखी दिसते 'ही' टिकटॉक स्टार
कियारा अडवाणी लवकरच नेटफ्लिक्स फिल्म 'गिल्टी'मध्ये दिसून येणार आहे. याव्यतिरिक्त तिच्याकडे इतरही चित्रपटांच्या ऑफर्स आहेत.
मुंबई : सध्या एक टिकटॉक यूजर चर्चेत आहे. टिकटॉक यूजर कल्पना शर्मा सध्या कियारा अडवाणीची क्लोन झाली असून चाहत्यांच्या गळातील ताईत बनली आहे. 2019मध्ये रिलीज झालेली ब्लॉकबास्टर चित्रपट 'कबीर सिंह'मध्ये कियाराने साकरणात आलेल्या प्रीतीचे सगळे डॉयलॉग्स कल्पना टिकटॉकवर बोलताना दिसून येते.
कियाराप्रमाणे दिसत असल्यामुळे आणि तिच्या चित्रपटांचे डायलॉग्स असणारे टिकटॉक व्हिडीओ करून सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय झाली आहे.
कल्पना त्या सोशल मीडिया सेन्सेशनपैकी एक आहे. ज्यांनी अनेक बॉलिवुड स्टार्सचे क्लोन बनून चर्चेत आले आहेत. अक्षय कुमार, सलमान खान, आलिया भट्ट, टायगर श्रॉफ, कटरीना कैफ, ऐश्वर्या राय, प्रियांका चोप्रा, जॅकलिन फर्नांडिस, करिना कपूर, सैफ अली खान आणि करिश्मा कपूर यांसारख्या अनेक स्टार्स, त्यांच्याप्रमाणे दिसणारे लोक त्यांचे डॉयलॉग्स बोलतानाचे व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर शेअर करत आहेत. खासकरून टिकटॉकवर यांची लोकप्रियता सर्वाधिक आहे.
एवढंच नाहीतर कतरिना कैफची क्लोन अलिना रायला लोकप्रियता मिळाली असून तिला एका पंजाबी पॉप म्युझिक व्हिडीओची ऑफरही आली आहे. ज्यामध्ये तिने काही दिवसांपूर्वीच काम केलं आहे. काही अभिनेत्री जसं श्रीदेवी आणि मधुबालाचीही क्लोनिंग करून टिकटॉकवर अनेक व्हिडीओ तयार करत आहेत.
दरम्यान, कियारा अडवाणी लवकरच नेटफ्लिक्स फिल्म 'गिल्टी'मध्ये दिसून येणार आहे. याव्यतिरिक्त तिच्याकडे इतरही चित्रपटांच्या ऑफर्स आहेत.
संबंधित बातम्या :
ऑलिव्ह ग्रीन ड्रेसमध्ये सारा अली खानचा क्लासी लूक; चाहते म्हणाले, 'माशाल्लाह'PHOTO : 'मलंग'च्या प्रमोशदरम्यान स्पॉट झाली दिशा पाटनी; लूक होतोय व्हायरल
Sooryavanshi Teaser | बहुप्रतीक्षित 'सूर्यवंशी'चा हटके टीझर प्रदर्शित
'गंगुबाई काठीयावाडी'च्या रूपातील आलिया भटचा लूक रिलीज