एक्स्प्लोर

रश्मिका मंदानाच्या वेडिंग लूकवर चाहत्यांच्या नजरा; साडीच्या पदरावर विजयसाठी लिहिला खास मेसेज, PHOTO व्हायरल

Rashmika and vijay deveakonda marriage photo: रश्मिका आणि विजय आपल्या वेडिंग लूकमध्ये पारंपारिक आणि रॉयल दिसत होते.

Rashmika and Vijay Deverakonda: रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा या दोघांनी साताजन्माच्या गाठी बांधल्या आहेत. दोघांचा विवाहसोहळा अगदी शाही पद्धतीने पार पडला.  26 फेब्रुवारी रोजी उदयपूरमध्ये दोघांनी लग्न केले.  त्यांच्या लग्नाचे फोटो अजूनही सोशल मीडियात व्हायरल होत आहे. रश्मिका आणि विजयचा लग्नाचा लूक देखील चर्चेचा विषय ठरत आहे.  रश्मिकाचा वेडिंग लूक लक्षवेधी होता. तिचा शाही लूक पाहून सर्वजण मंत्रमुग्ध झाले. तर, विजयच्या पारंपारिक पोशाखातील लूक पाहून  नेटकऱ्यांनी त्याचं कौतुक केलं. सध्या त्यांचा लूक सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

रश्मिका मंदानाने आपल्या लग्न सोहळ्यात  रस्ट ऑरेंज आणि गोल्डन रंगाची साडी नेसली होती. तिनं आपला ब्रायडल लूक गोल्ड हेवी ज्वेलरीनं पूर्ण केला. या लूकमध्ये रश्मिका जणू स्वर्गातून उतरलेली अप्सरा वाटत होती. रश्मिकाच्या लग्नाची साडी प्रसिद्ध सेलिब्रिटी डिझायनर  अनामिका खन्ना यांनी डिझाइन केली होती. साडीसोबत अभिनेत्रीनं सोनेरी रंगाच्या नेटची ओढणी कॅरी केली होती.  रस्ट ऑरेंज रंगाच्या साडीसोबत गोल्डन ओढणी सुरेख दिसत होती.  तिच्या रॉयल लूकवर अनेकांच्या नजरा खिळल्या. 

रश्मिकाच्या ओढणीवर हेवी एम्ब्रॉयडरी होती. या एम्ब्रॉयडरीमध्ये विजय देवरकोंडासाठी एक खास सरप्राइज दडलेले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रश्मिकाच्या गोल्डन ओढणीवर  विजयसाठी खास लविंग मेसेज लिहिले होते. या मेसेजमधून, तिनं सात जन्म त्याच्यासोबत राहण्याचे वचन दिले आहे. तिनं मेसेजमध्ये, 'IN EVERY LIFETIME' 'प्रत्येक जीवनकाळासाठी...' असं लिहिलं आहे. सध्या रश्मिकाचा वेडिंग लूक सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vijay Deverakonda (@thedeverakonda)

लग्नानंतर नवविवाहित जोडपे, विजय आणि रश्मिका विमानतळावर दिसले.  रश्मिका सुंदर, सिंपल पण मोहक दिसत होती. लाल रंगाच्या पोशाखात अभिनेत्री सुरेख दिसत होती.  भव्य लग्न सोहळ्यानंतर रिसेप्शन 4 मार्च रोजी होणार आहे. अनेक दक्षिण भारतीय सेलिब्रिटी, या रिसेप्शनला उपस्थित राहणार असल्याची  शक्यता आहे.  दरम्यान, रश्मिका आणि विजयच्या रिसेप्शनला नेमकं कोण कोण उपस्थित राहणार? हे पाहण उत्सुकतेचं ठरेल.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

लग्नाची वरात, लालबागच्या राजाच्या दरबारात! लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेतील कलाकारांची धम्माल मस्ती, पाहा PHOTO

महत्त्वाच्या बातम्या

Asha Kale: 'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
ZEE5 Marathi: मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget