नवरी आली नवऱ्याच्या गावा! रश्मिकाचं विजयच्या घरी भव्य स्वागत, सासू बाईंनी हात धरुन...; VIDEO व्हायरल
Rashmika Mandanna Vijay Deverakonda Wedding: हैदराबादमध्ये रश्मिका मंदान्नाचं भव्य स्वागत करण्यात आलं. सध्या तिचा विजयच्या घरात जातानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Rashmika Mandanna sasural welcome video Hyderabad: साऊथ सुपरस्टार कपल रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा विवाहबंधनात अडकले. 26 फेब्रुवारी रोजी या कपलने धार्मिक विधीनुसार लग्न केले. उदयपूरमध्ये अगदी शाही पद्धतीने त्यांचा विवाह सोहळा पार पडला. लग्न सोहळा पार पडल्यानंतर विजय आणि रश्मिकाने इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. दोघेही फोटोंमध्ये अगदी आनंदात दिसत आहेत. दोघांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. अशातच रश्मिकाचा सासरी जातानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. लग्नाच्या एक दिवसानंतर रश्मिका उदयपूरहून तिच्या सासरी गेली. शुक्रवारी, रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा हैदराबादच्या घरी परतले आहेत. यावेळी रश्मिकाचे अगदी भव्य स्वागत करण्यात आले. तिचा सासरच्या घरात जात असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
लग्नापूर्वी विजय देवरकोंडाचे घर सजवण्यात आले होते. विजयचं घर आकर्षक लाइटिंगमुळे लख्ख प्रकाशात उजळून निघालं होतं. लग्नानंतर शुक्रवारी नवविवाहित जोडपे विजयच्या घरी पोहोचले. रश्मिकाचे तिच्या सासू - सासऱ्यांच्या घरी आनंदाने स्वागत करण्यात आले. रश्मिकाचे हात धरुन विजयच्या आईने आपल्या सुनेचे स्वागत केले. रश्मिका खूप आनंदात दिसत आहे. उदयपूरहून निघताना रश्मिका मंदानाने लाल रंगाचा अनारकली ड्रेस परिधान केला होता. तिनं सिंपल मेकअप लूक कॅरी केला होता.
गळ्यात मंगळसूत्र, भांगेत कुंकू आणि हातात बांगड्या... नवविवाहित वधू अर्थात रश्मिका खूप सुंदर दिसत होती. तर, विजयने रेशमी कुर्ता आणि पायजमा घातला होता. विजयचा लूक देखील सिंपल आणि छान होता. सध्या रश्मिकाचा सासरी जात असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
रश्मिका आणि विजयच्या लग्नाचे रिसेप्शन कधी होईल?
View this post on Instagram
साऊथ सुपरस्टार रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांचा उदयपूर येथे विवाहसोहळा पार पडला. या समारंभाला खास जवळचे मित्र, कलाकार आणि काही बिझनेसमॅन उपस्थित होते. या शाही लग्नानंतर, रिसेप्शनचे देखील आयोजन करण्यात येणार आहे. त्यांचा रिसेप्शन 4 मार्च रोजी होणार आहे. या खास रिसेप्शनसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काही दिग्गज कलाकारांना आमंत्रित करण्यात आले आहे.
























