एक्स्प्लोर

Israel vs Iran War: अमेरिका-इस्त्रायलच्या हल्ल्यांना इराणचं जोरदार प्रत्युत्तर; 'या' 8 देशांवर निशाणा, आतापर्यंत काय-काय घडलं?

Israel vs Iran War : अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर मोठ्या प्रमाणावर लष्करी हल्ले केल्यानंतर मध्यपूर्वेत तणाव शिगेला पोहोचला आहे. दरम्यान, संपूर्ण मध्यपूर्वेत युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

Israel vs Iran War : अमेरिका आणि इस्त्रायल यांनी शनिवारी (28 फेब्रुवारी 2026) इराणवर मोठ्या प्रमाणावर लष्करी हल्ले केले आहेत. अमेरिकेने या मोहिमेला ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ असे नाव दिले आहे, तर इस्त्रायलने तिला ‘लायन्स रोर’ असे संबोधले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या कारवाईला इराणविरुद्धचे मोठे लष्करी अभियान असे घोषित केले आहे. हल्ल्यादरम्यान इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी (Ali Khamenei) यांच्या कार्यालयाजवळील परिसरालाही लक्ष्य करण्यात आले आहे. अमेरिका आणि इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात इराणेचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याचा दावा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केला. बेंजामिन नेतान्याहू (Benjamin Netanyahu) यांनी केलेल्या घोषणेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी देखील दुजोरा दिलाय. 

Israel vs Iran War : अमेरिका-इस्त्रायलच्या हल्ल्याला इराणचं जोरदार प्रत्युत्तर

इराणने प्रत्युत्तरात्मक कारवाई करत मध्यपूर्वेत असलेल्या अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य केले. इराणी सैन्य आणि इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) यांनी परिसरातील अमेरिकन तळांवर हल्ले केल्याचे सांगितले जाते. कतार, बहरेन, जॉर्डन, इराक, अबू धाबी, दुबई तसेच संयुक्त अरब अमिरातीतील इतर भागांत स्फोटांचे आवाज ऐकू आल्याची माहिती आहे.

इराणने दावा केला आहे की, आपल्या मोहिमेअंतर्गत ते अमेरिकन आणि इस्त्रायली तळे व मालमत्तांना लक्ष्य करत आहेत. या भागातील सुरक्षा परिस्थिती अत्यंत संवेदनशील बनली आहे. इराणवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलमध्येही सायरन वाजवण्यात आले असून नागरिकांना तातडीने शेल्टरमध्ये जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गाझामधील अलीकडील तणाव आणि कथित शांतता प्रयत्नांनंतर पुन्हा एकदा इस्त्रायलमध्ये आपत्कालीन स्थितीसारखे वातावरण निर्माण झाले आहे. इराणकडून संभाव्य क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहे.

Israel vs Iran War : प्रादेशिक आणि जागतिक परिणाम

मध्यपूर्वेत सुरू असलेला हा लष्करी संघर्ष व्यापक प्रादेशिक युद्धाचे रूप धारण करू शकतो. जागतिक तेलपुरवठा, आंतरराष्ट्रीय व्यापार मार्गावर याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. अनेक देशांनी संयम बाळगण्याचे आणि तात्काळ युद्धविरामाचे आवाहन केले आहे.

Israel vs Iran War : मध्यपूर्वेतील तणावाचा हवाई सेवांवर परिणाम

मध्यपूर्वेत वाढत्या लष्करी तणावाच्या पार्श्वभूमीवर हवाई सेवांवरही परिणाम झाला आहे. एअर इंडियाने सुरक्षा कारणांचा हवाला देत या भागासाठीच्या आपल्या सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत परिस्थिती सामान्य होईपर्यंत सेवा स्थगित ठेवण्यात येतील, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

यापूर्वी, सीरियासह आखाती देशांनी त्यांचे हवाई क्षेत्र तात्पुरते बंद केले होते. या प्रदेशात क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांच्या धोक्यामुळे हे पाऊल उचलण्यात आले. हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय उड्डाणे मार्ग बदलणे किंवा रद्द करणे भाग पडले आहे. तुर्की एअरलाइन्सने देखील 2 मार्चपर्यंत मध्य पूर्वेतील आपल्या उड्डाणे स्थगित केली आहेत. एअरलाइनने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, ते परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे आणि सुरक्षेच्या आढाव्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल.

आणखी वाचा 

Israel vs Iran War: मध्य पूर्व युद्धाच्या विळख्यात, 11 देशांचे हवाई क्षेत्र धोकादायक म्हणून घोषित; डीजीसीएची माहिती

महत्त्वाच्या बातम्या

Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
Nuclear Attack : पाकिस्तान भारतावर अणुबॉम्ब हल्ला करणार; 'या' प्राध्यापकाचा मोठा दावा, या आधीची भविष्यवाणीही खरी ठरली
पाकिस्तान भारतावर अणुबॉम्ब हल्ला करणार; 'या' प्राध्यापकाचा मोठा दावा, या आधीची भविष्यवाणीही खरी ठरली

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
PM Modi Independence Day speech: भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Embed widget