इराण इस्रायल अमेरिकेच्या तणावात अडकली बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, दुबईतून थेट PM मोदींना मदतीसाठी हाक
अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत 200 इराणी नागरिकांच्या मृत्यू झाला असून 800 हून अधिक नागरिक गंभीर जखमी आहेत

Iran Isreal War Actress Stuck: मध्यपूर्वेत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेत्री सोनल चौहान सध्या दुबईत अडकली असल्याची माहिती समोर आली आहे. इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर हल्ला केल्यानंतर परिस्थिती तणावपूर्ण झाली असून दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे अनेक प्रवाशांसह सोनल चौहानही तिथेच अडकून पडली आहे.(israel-iran tension)
अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत 200 इराणी नागरिकांच्या मृत्यू झाला असून 800 हून अधिक नागरिक गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
बॉलीवूड अभिनेत्री अडकली दुबईत
अभिनेत्री सोनल चौहानने शनिवारी इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करत भारत सरकारकडे मदतीची विनंती केली. तिने लिहिले, “माननीय नरेंद्र मोदीजी, सध्या दुबईतील तणावपूर्ण परिस्थितीत मी अडकले आहे. सर्व फ्लाइट्स रद्द झाल्या आहेत आणि भारतात परतण्याचा कोणताही स्पष्ट मार्ग दिसत नाही. सुरक्षित घरी परतण्यासाठी सरकारकडून मार्गदर्शन आणि मदतीची अपेक्षा आहे.” असं तिने लिहिलंय.

दरम्यान, दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू हिलाही याच समस्येला सामोरे जावे लागत असल्याचे समोर आले आहे. तिने इंस्टाग्रामवर विमानतळावरील गोंधळाची झलक शेअर करत पुढील सूचनेपर्यंत सर्व उड्डाणे स्थगित असल्याचे सांगितले.
कोण आहे सोनल चौहान?
कामाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, सोनल चौहानला 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या जन्नत या चित्रपटातून मोठी ओळख मिळाली. या चित्रपटानंतर ती चर्चेत आली. पुढे तिने हिंदीसोबत तेलुगू, तमिळ आणि कन्नड चित्रपटांमध्येही काम केले. तिने पहला सितारा, लेजेंड, 3G, बुड्ढा होगा तेरा बाप, साइज झिरो, रूलर, पलटन, डिक्टेटर, द पावर, द घोस्ट आणि आदिपुरुष अशा अनेक चित्रपटांत भूमिका साकारल्या. आदिपुरुषमध्ये ती मंदोदरीच्या भूमिकेत दिसली होती. अलीकडेच ती दर्द या बांग्लादेशी-बंगाली चित्रपटात झळकली. याशिवाय तिची अनेक म्युझिक व्हिडिओजही चर्चेत राहिली आहेत.























