एक्स्प्लोर

Ind vs WI Playing XI T20 World Cup 2026: टी-20 विश्वचषकात भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये आज करो वा मरोची लढत; दोन्ही संघांची हादरवणारी Playing XI

Ind vs WI Playing XI T20 World Cup 2026: कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर भारत आणि वेस्ट इंडिजचा सामना खेळवण्यात येणार असून दोन्ही संघासाठी करो वा मरोची लढत असणार आहे.

Ind vs WI Playing XI T20 World Cup 2026: आयसीसी टी-20 विश्वचषकात आज भारत विरुद्ध वेस्ट इंडिजमध्ये (India vs West Indies) सामना रंगणार आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर भारत आणि वेस्ट इंडिजचा सामना खेळवण्यात येणार असून दोन्ही संघासाठी करो वा मरोची लढत असणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज जो संघ जिंकेल, तो सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल. दोन्ही संघांनी आतापर्यंत एकूण चार टी-20 विश्वचषक सामने खेळले आहेत. वेस्ट इंडिजने यापैकी तीन जिंकले आहेत, तर भारताने फक्त एकदाच विजय मिळवला आहे.

वेस्ट इंडिजविरुद्ध टीम इंडिया संघात कोणताही बदल न करण्याची शक्यता आहे. रिंकू सिंह, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज या खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणार नाही. तर अभिषेक शर्मासह संजू सॅमसन सलामीसाठी मैदानात उतरेल. त्यानंतर इशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या शिवम दुबे, अक्षर पटेल फलंदाजीची बाजू सांभाळतील. तर जसप्रीत बुमराहसह अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती गोलंदाजीची बाजू सांभाळतील. दरम्यान, भारत आणि वेस्ट इंडिजकडे सामना कधीही कोणत्याही बाजूला वळवण्याची ताकद असणारे खेळाडू आहेत.

वेस्ट इंडिजविरुद्ध अशी असेल टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन- (Ind vs WI Playing XI T20 World Cup 2026)

संजू सॅमसन (यष्टिरक्षक), अभिषेक शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती.

भारताविरुद्ध वेस्ट इंडिजची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-

ब्रँडन किंग, शाई होप (यष्टिरक्षक/कर्णधार), शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, शेरफेन रुदरफोर्ड, रोस्टन चेस/अकील हुसेन, रोमारियो शेफर्ड, जेसन होल्डर, मॅथ्यू फोर्ड, गुडाकेश मोती आणि शमार जोसेफ.

भारताचा संपूर्ण संघ- (Team India Full Squad T20 WC)

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, इशान किशन, हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रिंकू सिंग.

वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ- (West Indies Full Squad T20 WC)

बॅंडन किंग, शाई होप (यष्टीरक्षक/कर्णधार), शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, शेरफेन रुदरफोर्ड, रोमारियो शेफर्ड, जेसन होल्डर, मॅथ्यू फोर्ड, अकिल हुसेन, गुडाकेश मोटी, शमर जोसेफ, क्वेंटिन सॅम्पसन, जेडेन सील्स, रोस्टन चेस आणि जॉन्सन चार्ल्स.

वेस्ट इंडिजचे हे खेळाडू धोकादायक- (WI Dangerous Player)

भारताला वेस्ट इंडिजचा फिरकीपटू गुडाकेश मोटी (6 सामन्यात 10 विकेट्स) आणि जेसन होल्डर (6 सामन्यात 8 विकेट्स) यांच्यापासून सावध राहावे लागेल. शिमरॉन हेटमायरने 6 सामन्यात 221 धावा केल्या आहेत. कर्णधार शाई होपने 6 सामन्यांमध्ये 185 धावा केल्या आहेत, तर शेरफेन रदरफोर्डने 6 सामन्यांमध्ये 169 धावा केल्या आहेत.

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज हेड-टू-हेड (एकूण टी-20)- (Ind vs WI Head To Head)

2009 ते 2023 पर्यंत भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या 30 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचा विजयाचा रेट 65.71% आहे, ज्यामध्ये 19 विजय आणि 10 पराभव आहेत, तर वेस्ट इंडिजचा 10 विजय आणि 19 पराभवांसह 34.48% विजयाचा टक्का आहे. दोन्ही संघांचा एक अनिर्णीत सामना होता.

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज हेड-टू-हेड (टी-20 विश्वचषक)- (Ind vs WI)

2009 ते 2016 पर्यंत भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या चार टी-20 विश्वचषक सामन्यांमध्ये भारताने फक्त एक सामना जिंकला आणि तीन गमावले.

संबंधित बातमी:

IND vs WI T20 World Cup 2026 : कोलकाताच्या ईडनवर वेस्ट इंडिजसमोर भारताचा भूतकाळ काय सांगतो? हा एक ट्विस्ट ठरवणार अंतिम चारचं भविष्य

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India : जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
अक्षर पटेलने ते दोन अफलातून कॅच कसे पकडले? मनात नेमकं काय चाललं होतं? 'बापू'चा व्हिडीओ व्हायरल
अक्षर पटेलने ते दोन अफलातून कॅच कसे पकडले? मनात नेमकं काय चाललं होतं? 'बापू'चा व्हिडीओ व्हायरल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Ind vs Nz T20 World Cup 2026 Final Ticket : भारत-न्यूझीलंड महामुकाबला! नरेंद्र मोदी स्टेडियमचं 3,000 ते 75,000 तिकीट दर, ऑनलाइन बुकिंग कशी करायची?, A टू Z माहिती
भारत-न्यूझीलंड महामुकाबला! नरेंद्र मोदी स्टेडियमचं 3,000 ते 75,000 तिकीट दर, ऑनलाइन बुकिंग कशी करायची?, A टू Z माहिती
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chana Price Crisis : हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
Team India : जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Embed widget