एक्स्प्लोर
ऑलिव्ह ग्रीन ड्रेसमध्ये सारा अली खानचा क्लासी लूक; चाहते म्हणाले, 'माशाल्लाह'
सारा अली खानच्या कामाबाबत बोलायचे झाले तर, सारा आगामी चित्रपट 'अतरंगी रे' मध्ये दिसून येणार आहे. हा चित्रपट पुढिल वर्षी 14 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे. चित्रपटात तिच्यासोबत अक्षय कुमार आणि धनुष दिसणार आहेत.
मुंबई : अभिनेत्री सारा अली खानने काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या दिग्दर्शक इम्तियाज अलीचा चित्रपट 'लव आजकल'ला भारतीय बॉक्स ऑफिसवर फारसा चर्चेत राहिला नाही. अभिनेता वरूण धवनसोबत 'कुली नं. 1'च्या शुटिंगमध्ये बीझी आहे. पण यासर्व गोष्टिंव्यतिरिक्त सारा सध्या तिच्या फोटोमुळे चर्चेत आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असून ती आपले फोटो सोशल मीडिया अकाउंट्सवर शेअर करत असते. साराने असाच आपला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
सारा सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. तिने सध्या सोशल मीडिया प्लॅफॉर्म असलेल्या इन्स्टाग्रामवर आपला एक फोटो शेअर केला आहे. तिचा या फोटोला चाहते पसंती दर्शवत आहेत. या फोटोमध्ये तिने ऑलिव ग्रीन रंगाचा ऑफ शोल्डर टॉप वेअर केला आहे. तसेच लूक थोडासा मेकअप करून कम्प्लिट केला आहे. याचसोबत साराने आपल्या ड्रेसला मॅचिंग होणारी ओव्हर साइज एथनिक इअरिंगही वेअर केली आहे. 'लाइक मदर, लाइक डॉटर' ; सारा अली खानने शेअर केला आईसोबतचा फोटोView this post on Instagram
साराने शेअर केलेल्या फोटोला आतापर्यंत 7,26,178 लाइक्स मिळाले आहेत. तर 2761 लोकांनी या फोटोवर कमेंट केली आहे. या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की, 'तुम्ही एवढे सुंदर कसे दिसू शकता', तर आणखी एका यूजरने 'माशाल्लाह' असं लिहिलं आहे. सारा अली खानच्या कामाबाबत बोलायचे झाले तर, सारा आगामी चित्रपट 'अतरंगी रे' मध्ये दिसून येणार आहे. हा चित्रपट पुढिल वर्षी 14 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे. चित्रपटात तिच्यासोबत अक्षय कुमार आणि धनुष दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. तिथे हे तिनही कलाकार एकत्र दिसून आले होते. संबंधित बातम्या : PHOTO : 'मलंग'च्या प्रमोशदरम्यान स्पॉट झाली दिशा पाटनी; लूक होतोय व्हायरल Sooryavanshi Teaser | बहुप्रतीक्षित 'सूर्यवंशी'चा हटके टीझर प्रदर्शित 'गंगुबाई काठीयावाडी'च्या रूपातील आलिया भटचा लूक रिलीज
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement