Shiv Thakare : 'खतरों के खिलाडी 13'मधील शिव ठाकरेचा प्रवास संपला; चाहते म्हणाले,"आमचा खेळाडू हरणारा नाही"
Shiv Thakare : 'खतरों के खिलाडी 13' (Khatron Ke Khiladi 13) या कार्यक्रमातील शिव ठाकरेचा प्रवास संपला आहे.
Shiv Thakare On Khatron Ke Khiladi 13 : 'खतरों के खिलाडी 13' (Kharron Ke Khiladi 13) हा रोहित शेट्टीचा लोकप्रिय कार्यक्रम आहे. गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेत या कार्यक्रमाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमात छोट्या पडद्यावरील अनेक मंडळी स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहे. मराठमोळा 'आपला माणूस' शिव ठाकरेही (Shiv Thakare) या पर्वात सहभागी झाला होता. पण आता यापर्वातील त्याचा प्रवास संपला आहे.
'खतरों के खिलाडी 13' सुरू होऊन आता एक महिना पूर्ण झाला आहे. एका महिन्यात चार एलिमिनेशन्स झाले आहेत. यात रुही चतुर्वेदी, अंजुम फकीह, अंजली आनंद आणि शिव ठाकरे हे स्पर्धक एविक्ट झाले आहेत. त्यामुळे सहभागी झालेल्या 14 स्पर्धकांपैकी आता फक्त 10 खेळाडू राहिले आहेत.
'बिग बॉस मराठी 2'चा विजेता आणि 'बिग बॉस 16'चा पहिला रनर अप शिव ठाकरेचा 'खतरों के खिलाडी 13'मधील प्रवास संपला असल्याने चाहते नाराज झाले आहेत. तसेच शिवला हा खेळ सोडावा लागणार असल्याने रोहित शेट्टीदेखील नाराज झाला आहे. दुसरीकडे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवच्या खेळीचं कौतुक करत आहेत.
'खतरों के खिलाडी 13'मध्ये 'या' स्पर्धकांचा सहभाग (Khatron Ke Khiladi 13 Contestant)
'खतरों के खिलाडी 13'मध्ये डेजी शाह, अर्जित तनेजा, शीझान खान, रुही चतुर्वेदी, रोहित बोस रॉय, रश्मीत कौर, अंजुम फकीह, अंजली आनंद आणि शिव ठाकरे हे स्पर्धक सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाची आता प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
'खतरों के खिलाडी 13'च्या शूटिंगदरम्यान शिव ठाकरे जखमी
'खतरों के खिलाडी 13'च्या शूटिंगदरम्यान शिव ठाकरे जखमी झाला होता. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये त्याच्या हाताला दुखापत झालेलं दिसून आलं. सेच त्याच्या हाताच्या बोटाला टाकेदेखील पडले आहेत. शिव नेहमीच लढवय्या म्हणून ओळखला जातो. त्यामुळे चाहते त्याच्या व्हिडीओवर कमेंट्स करत त्याला 'योद्धा' म्हणत आहेत. आता शिवचा या खेळातील प्रवास संपल्याने चाहते 'आमचा खेळाडू हरणारा नाही, अशा कमेंट्स करत आहेत.
'खतरों के खिलाडी 13'च्या शूटिंगदरम्यान 'हे' स्पर्धक जखमी
'खतरों के खिलाडी 13'च्या शूटिंगदरम्यान स्टंट करताना अनेत स्पर्धक जखमी झाले आहेत. नायरा बॅनर्जी, रोहित रॉय, अरिजित तनेजा, ऐश्वर्या शर्मा या कलाकारांचा यात समावेश आहे. रोहित शेट्टी हा कार्यक्रम होस्ट करणार आहे.
संबंधित बातम्या