Shiv Thakare : 'खतरों के खिलाडी 13'चा पहिला फायनलिस्ट 'आपला माणूस' शिव ठाकरे! 'बिग बॉस' नंतर आता गाजवतोय 'Khatron Ke Khiladi'
Khatron Ke Khiladi 13 : 'खतरों के खिलाडी 13'च्या पर्वाचा शिव ठाकरे पहिला फायनलिस्ट शिव ठाकरे ठरला आहे.
Khatron Ke Khiladi Season 13 First Finalist Shiv Thakare : बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक रोहित शेट्टीचा 'खतरों के खिलाडी' (Khatron Ke Khiladi 13) या कार्यक्रमाचं प्रत्येक पर्व खूपच रंजक असतं. 'खतरों के खिलाडी 13' खूपच खास असणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच या कार्यक्रमाचा प्रोमो आऊट झाला आहे. आता 'आपला माणूस' शिव ठाकरे (Shiv Thakare) 'खतरों के खिलाडी 13'चा पहिला फायनलिस्ट असणार असल्याचं म्हटलं जात आहे.
'खतरों के खिलाडी 13'चा पहिला फायनलिस्ट शिव ठाकरे (Khatron Ke Khiladi Season 13 First Finalist Shiv Thakare)
मीडिया रिपोर्टनुसार, शिव ठाकरे 'खतरों के खिलाडी 13'चा पहिला फायनलिस्ट आहे. अद्याप यासंदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 'खतरों के खिलाडी 13'चा पहिला फायनलिस्ट मराठमोळा शिव झाल्याने त्याच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. शिव ठाकरेचा मोठा चाहतावर्ग आहे. 'बिग बॉस मराठी'चा तो विजेता होता. हिंदी बिग बॉस आणि रोडीजदेखील त्याने गाजवलं आहे. आता 'खतरों के खिलाडी 13' गाजवण्यासाठी तो सज्ज आहे.
मराठमोळ्या शिव ठाकरेच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शिवच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता आहे. आता 'खतरों के खिलाडी 13'नंतर तो 'रोडीज 19'मध्ये गँग लीडर म्हणून दिसणार आहे. 'खतरों के खिलाडी 13'मध्ये शिव ठाकरे उंचावरुन लटकताना, साप-मगरी यांच्यामध्ये स्टंटबाजी करताना दिसणार आहे.
'खतरों के खिलाडी 13'बद्दल बोलताना शिव ठाकरे म्हणाला,"मी खूप ध्येयवादी आहे. एखादी गोष्ट ठरवल्यानंतर ती साध्य करण्याचा मी प्रयत्न करतो. बिग बॉसनंतर मला अनेक चांगल्या ऑफर मिळाल्या. रिअॅलिटी शो करायला मला आवडतं. त्यामुळे 'खतरों के खिलाडी 13'साठी मी होकार दिला. आता मला सिनेमा करण्याची इच्छा आहे".
'खतरों के खिलाडी 13'मध्ये 'या' स्पर्धकांचा सहभाग (Khatron Ke Khiladi 13 Contestant)
'खतरों के खिलाडी 13'मध्ये छोट्या पडद्यावरील अनेक स्पर्धक सहभागी झाले आहेत. अर्चना गौतम, अंजुम फकीह, रोहित बोस राय, डेजी शाह, शिव ठाकरे, अंजली आनंद, नायरा एम बॅनर्जी, रुही चतुर्वेदी, ऐश्वर्या शर्मा, अर्जित तनेजा, शीझान खान, डिनो जेम्स, रश्मीत कौर आणि सौंदस मौफकीर या स्पर्धकांचा समावेश आहे. 'खतरों के खिलाडी 13' हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
संबंधित बातम्या