Ketaki Mategaonkar: "श्वासोच्छवासाचा त्रास, धुळीची अॅलर्जी आणि..."; मुंबईतील प्रदूषणाबाबत केतकी माटेगावकरची पोस्ट
केतकीनं नुकतीच मुंबईमधील प्रदूषणाबाबत (Mumbai Pollution) एक पोस्ट शेअर केली आहे.
Ketaki Mategaonkar: गायिका आणि अभिनेत्री केतकी माटेगावकर (Ketaki Mategaonkar) ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या अंकुश या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तिनं रावी ही भूमिका साकारली. केतकी ही सोशल मीडियावर तिच्या चित्रपटांची माहिती देत असते. तसेच केतकी ही विविध विषयांवर आधारित असणाऱ्या पोस्ट देखील शेअर करते. केतकीनं नुकतीच मुंबईमधील प्रदूषणाबाबत (Mumbai Pollution) एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून केतकीनं महापालिकेकडे प्रदूषणाबाबत गांभीर्याने विचार करावा, अशी विनंती केली आहे.
केतकीची पोस्ट
केतकीनं इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं, "#मुंबई, ही गोष्ट गांभीर्याने विचारात घेण्याची गरज आहे, प्रदूषणात वाढ होत आहे! सर्वत्र लोकांना श्वासोच्छवासाचा त्रास, धुळीची ऍलर्जी आणि व्हायरल इन्फेक्शनचा त्रास होत आहे. सुरू असलेली बांधकामे आणि इमारतींची कामे याकडे लक्ष देऊन खबरदारी घेणे आवश्यक आहे! जलस्त्रोतांजवळ कोणताही कचरा फेकण्याआधी विचार करावा. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची विनंती मी एक जागृत नागरिक म्हणून करत आहे.” या पोस्टमध्ये केतकीनं बीएमसीला टॅग केलं आहे. केतकीच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
केतकीचे चित्रपट
केतकीचा अंकुश हा चित्रपट 6 ऑक्टोबर रोजी रिलीज झाला होता. शाळा,टाईमपास, काकस्पर्श, फुंतरू, टाईमपास-2 या चित्रपटांमध्ये देखील केतकीनं काम केलं. आता अंकुश या चित्रपटानंतर केतकीच्या आगामी चित्रपटांची देखील प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. केतकी ही गायिका देखील आहे. 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स' या स्पर्धेत सहभाग घेतला होता. मला वेड लागले प्रेमाचे,कसा जीव गुंतला,ओली ती माती, सुन्या सुन्या ही गाणी केतकीनं गायली आहेत. तिच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.
View this post on Instagram
केतकी माटेगावकर ही सोशल मीडियावर देखील अॅक्टिव असते. तिल इन्स्टाग्रामवर एक मिलियन फॉलोवर्स आहेत. केतकी ही तिच्या विविध लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. केतकी माटेगावकरनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोवर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :
Ketaki Mategaonkar: पारंपरिक लूक असो किंवा वेस्टर्न, केतकी दिसते प्रचंड सुंदर!