एक्स्प्लोर
Advertisement
करिश्मा-संजयचा अखेर घटस्फोट, मुलांना 10 कोटी, डुप्लेक्स बंगला
मुंबई : करिश्मा कपूर आणि संजय कपूर आता कायदेशीररित्या विभक्त झाले आहे. मुंबईच्या फॅमिली कोर्टाने त्यांच्या घटस्फोटाला मंजुरी दिली आहे. या दोघांनी 2014 मध्ये घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता. यादरम्यान या प्रकरणात अनेक चढउतार पाहायला मिळाले. मुलांच्या ताब्याबाबत प्रकरणात गुंता निर्माण झाला होता. मात्र परस्पर सहमतीने याच वर्षाच्या एप्रिल महिन्यात तोडगा निघाला. दोन्ही मुलांचा ताबा आता करिश्माकडे राहणार आहे.
मुलांना 10 कोटी रुपये तर करिश्माकडे बंगला
- घटस्फोटानंतर संजय कपूरने मुलांच्या नावे दहा कोटी रुपये ठेवले आहेत. तर करिश्मा ज्या डुप्लेक्स बंगल्यात राहते तो तिच्याच नावे राहिल.
- याशिवाय संजयला मुलांच्या शिक्षणाचा तसंच इतर खर्च उचलावा लागेल.
- करिश्मा केवळ तिचे दागिनेच नाही, तर लग्नावेळी संजयच्या कुटुंबीयांकडून मिळालेले दागिनेही स्वत:कडे ठेवू शकते.
करिश्मा-संजय यांच्यात घटस्फोटावर सहमती, करिश्माकडे मुलांचा ताबा
- दोन्ही मुलं समायरा आणि कियान करिश्माकडे राहतील. मात्र मुलांना भेटण्याचा अधिकार संजयकडे सुरक्षित आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, वर्षातील दो ते तीन महिने संजय मुलांसोबत राहू शकतो. 2012 पासून करिश्मा-संजय वेगळे राहत होते! करिश्मा आणि संजय कपूरचा विवाह 29 सप्टेंबर 2003 रोजी झाला होता. हे करिश्माचं पहिलं तर संजयचं दुसरं लग्न होतं. मात्र 2012 मध्ये दोघे वेगळे झाले. करिश्मा आई बबितासह मुंबईत राहत आहे. करिश्माने पती संजय आणि सासू राणी सुंदर कपूरवर मानसिक छळ केल्याचा आरोप केला होता.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
महाराष्ट्र
बीड
Advertisement