Rishab Shetty On Joining Politics: कांताराच्या यशानंतर राजकारणात प्रवेश करणार? ऋषभ शेट्टी म्हणाला...
कांताराच्या यशानंतर ऋषभ लवकरच राजकारणात प्रवेश करणार आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. यावर आता ऋषभनं प्रतिक्रिया दिली आहे.
Rishab Shetty On Joining Politics: कांतारा (Kantara) हा चित्रपट 2022 मधील सर्वात चर्चेत असणारा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या कथानकाचं तसेच चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. माणूस आणि निसर्ग यांच्या नातेसंबंधावर अधारित असणाऱ्या कांतारा या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली. कांतारा चित्रपटात अभिनेता ऋषभ शेट्टीनं (Rishab Shetty) प्रमुख भूमिका साकारली. ऋषभनेच या चित्रपटाचं दिग्दर्शन देखील केलं. आता कांताराच्या यशानंतर ऋषभ लवकरच राजकारणात प्रवेश करणार आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. यावर आता ऋषभनं प्रतिक्रिया दिली आहे.
एका नेटकऱ्याच्या ट्वीटला रिप्लाय देत राजकारणात प्रवेश न करण्याबाबत ऋषभनं सांगितलं. ऋषभ शेट्टी रिप्लाय दिला की, 'मी राजकारणात प्रवेश करणार नाही. ही खोटी बातमी आहे. काही लोकांना वाटतं की मी एका विशिष्ट पक्षाचा समर्थक आहे. पण मी कधीही राजकारणात जाणार नाही.'
एका चाहत्यानं सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिलं की ऋषभनं राजकारणात यावे आणि त्याला लोकांनी पाठिंबा द्यावा. यावर ऋषभ शेट्टी म्हणाले की, मला राजकारणातील समर्थनाची गरज नाही. कृपया माझ्या चित्रपटांना समर्थन द्या. हे माझ्यासाठी पुरेसे आहे.
'कांतारा' हा चित्रपट एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. अवघ्या 16 कोटींमध्ये बनलेला ‘कांतारा’ हा चित्रपट साऊथच नव्हे तर, हिंदीमध्येही हिट ठरला. 'कांतारा' चित्रपटात अच्युता कुमार, सप्तमी गौडा, प्रमोद शेट्टी आणि किशोर सहाय्यक भूमिकेत दिसले. कन्नड भाषेतील कांतारा हा चित्रपट हिंदी आणि तेलुगू या भाषांमध्ये देखील रिलीज करण्यात आला. या चित्रपटाचं अनेक सेलिब्रिटींनी कौतुक केलं आहे. कांतारा हा चित्रपट प्रेक्षक नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.
कांतारा-2 येणार प्रेक्षकांच्या भेटीस
ऋषभ शेट्टीच्या कांतारा या चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. होम्बले फिल्म्स या प्रोडक्शन हाऊसनं ट्विटर अकाऊंटवर एक ट्वीट शेअर केलं. या ट्वीटमध्ये लिहिलं, "नवीन वर्षाच्या या शुभ मुहूर्तावर, आम्हाला हे कळवताना आनंद होत आहे की, कांताराच्या दुसऱ्या भागाचे लेखन सुरू झाले आहे. निसर्गाशी असलेले आमचे नाते दर्शवणारी आणखी एक आकर्षक कथा तुमच्यासमोर मांडण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. अधिक अद्यतनांसाठी संपर्कात रहा." कांतारा-2 ची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
महत्वाच्या इतर बातम्या :
Rishab Shetty Prequel Of Kantara: प्रतीक्षा संपली! कांतारा-2 येतोय; ऋषभ शेट्टीनं दिली मोठी अपडेट