एक्स्प्लोर

Kangana Ranaut Trolled: लाल किल्ल्यावर रावण दहनावेळी कंगनाचा नेम चुकला; नेटकऱ्यांनी अभिनेत्रीची उडवली खिल्ली, म्हणाले...

पण सध्या कंगनाचा  एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे सध्या  अनेक नेटकरी कंगनाला ट्रोल करत आहेत.  

Kangana Ranaut Trolled: बॉलिवूडमधील अभिनेत्री कंगना रनौतने (Kangana Ranaut) मोठा इतिहास रचला आहे. कंगनाने दिल्लीतील प्रसिद्ध लवकुश रामलीलामध्ये रावण दहन केले आहे. 50 वर्षांच्या इतिहासात रावण दहन करणारी कंगना पहिली महिला ठरली आहे. पण सध्या दिल्लीतील कार्यक्रमामधील कंगनाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे सध्या  अनेक नेटकरी कंगनाला ट्रोल करत आहेत.  

कंगनाचा नेम चुकला

मंगळवारी दिल्लीत झालेल्या लवकुश रामलीलामध्ये रावणाचे दहन करण्यासाठी कंगना गेली होती.  कंगनाचा या कार्यक्रमातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दिसते की,  कंगना ही धनुष्यबाणातून बाण सोडण्याचा प्रयत्न करते पण तिचा नेम चुकतो.  

कंगनाला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

दिल्लीतील रावण दहन कार्यक्रमातील कंगनाचा व्हिडीओ शेअर करुन सध्या अनेक नेटकरी कंगनाला ट्रोल करत आहेत. एका नेटकऱ्यानं कंगनाचा व्हिडीओ शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "रिल लाईफ कंगना वर्सेस रिअल लाईफ कंगना.बाण चले ना चले पर नवाबी न घटे' तर दुसऱ्या युझरनं  ट्वीटमध्ये लिहिलं, 'जुबान चलाने से, तीर चलाना कितना आसान है.'

 

कंगनानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन नेटकऱ्यांना दसऱ्याच्या आणि विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने पोस्टमध्ये लिहिलं आहे,"आज मला दिल्लीच्या प्रसिद्ध लवकुश राम लीलामध्ये रावण दहन करण्याचे सौभाग्य मिळाले. ज्याप्रमाणे श्रीरामांनी रावणाशी युद्ध केले, त्याचप्रमाणे आपल्या देशाचे सैनिक राक्षसांशी लढतात. जय श्री राम,”

कंगनाचे आगामी चित्रपट 

कंगनाचा तेजस हा चित्रपट 27 ऑक्टोबर 2023 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. 'तेजस' या चित्रपटात कंगनासोबतच वरुण मित्रा देखील प्रमुख भूमिका साकाणार आहे. कंगनाचे इमर्जन्सी (Emergency)  आणि तेजस हे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.  इमर्जन्सी  या चित्रपटात कंगना ही इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या:

Kangana Ranaut : कंगना रनौतने लाल किल्ल्यावर केलं रावण दहन; 50 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एका स्त्रीला मिळाला मान

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

घाटकोपर होर्डिंग प्रकरणात मोठा खुलासा; निलंबित आयपीएस कैसर खालिद यांच्याविरोधात पुरावे सापडले, आता ACB करणार चौकशी
घाटकोपर होर्डिंग प्रकरणात मोठा खुलासा; निलंबित आयपीएस कैसर खालिद यांच्याविरोधात पुरावे सापडले, आता ACB करणार चौकशी
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Mumbai Heavy Rain: मुंबई, ठाण्यात पावसाची जोरदार बँटिंग, रस्त्यांना तळ्याचं स्वरुप, कामावर जाणाऱ्यांची कोंडी अटळ
मुंबई, ठाण्यात पावसाची जोरदार बँटिंग, रस्त्यांना तळ्याचं स्वरुप, कामावर जाणाऱ्यांची कोंडी अटळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Rain : मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस, जागोजागी साचलं पाणीRadhakrishna Vikhe Patil Ahmednagar : ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 07 July 2024Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
घाटकोपर होर्डिंग प्रकरणात मोठा खुलासा; निलंबित आयपीएस कैसर खालिद यांच्याविरोधात पुरावे सापडले, आता ACB करणार चौकशी
घाटकोपर होर्डिंग प्रकरणात मोठा खुलासा; निलंबित आयपीएस कैसर खालिद यांच्याविरोधात पुरावे सापडले, आता ACB करणार चौकशी
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Mumbai Heavy Rain: मुंबई, ठाण्यात पावसाची जोरदार बँटिंग, रस्त्यांना तळ्याचं स्वरुप, कामावर जाणाऱ्यांची कोंडी अटळ
मुंबई, ठाण्यात पावसाची जोरदार बँटिंग, रस्त्यांना तळ्याचं स्वरुप, कामावर जाणाऱ्यांची कोंडी अटळ
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
Embed widget