John Abraham on Instagram : जॉन अब्राहमने इंस्टाग्राम अकाऊंटवरून हटवल्या सर्व पोस्ट, चाहते गोंधळात
John Abraham on Instagram : बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून सर्व पोस्ट हटवल्या आहेत.
John Abraham on Instagram : बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमने (John Abraham) त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून सर्व पोस्ट हटवल्या आहेत. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर फॅन फॉलोअर असलेल्या जॉन अब्राहमने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून सर्व पोस्ट हटवल्या आहेत. त्याने त्याच्या अकाऊंटवरून त्याचे सर्व फोटो, व्हिडीओदेखील काढून टाकले आहेत. जॉन नुकताच 'सत्यमेव जयते 2' सिनेमाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
जॉन अब्राहमने सर्व पोस्ट हटवत चाहत्यांना गोंधळात टाकले आहे. जॉनचे सध्या 9.7 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. पण पोस्ट हटवण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
जॉन अब्राहम त्याच्या उल्लेखनीय अभिनय कौशल्यासाठी ओळखला जातो. जॉनचा वाढदिवस तीन दिवसांवर आला असताना त्याने असे कृत्य का केले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. येत्या तीन दिवसांत जॉन 49 वर्षांचा होणार आहे.
जॉन अब्राहमचे आगामी सिनेमे
जॉन अब्राहम सिद्धार्थ आनंदच्या आगामी 'पठान' चित्रपटात दीपिका पदुकोण आणि शाहरुख खानसोबत दिसणार आहे. 'सत्यमेव जयते 2' सिनेमातील गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत. हा सिनेमा मे महिन्यात प्रदर्शित होणार होता. पण कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सिनेमा प्रदर्शित होण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली. जॉन लवकरच 'एक विलेन रिटर्न्स' या सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा मोहित सूरी दिग्दर्शित करत आहेत. तारा सुतारिया, दिशा पटानी आणि अर्जुन कपूरच्या या सिनेमात मुख्य भूमिका आहेत.
संबंधित बातम्या
Brahmastra Motion Poster : 'लव्ह... लाइट... फायर...' ब्रह्मास्त्र चित्रपटाचा मोशन पोस्टर उद्या होणार रिलीज; अमिताभ बच्चन यांची खास पोस्ट
Katrina Vicky Weeding : कतरिना-विकीला सलमान खान, रणबीर कपूरकडूनही महागड्या भेटवस्तू; काय आहे गिफ्ट्सची यादी?
बॉलिवूडकर कोरोनाच्या विळख्यात? आणखी दोघींना संसर्गाची लागण, इतर सेलिब्रेटींचे अहवाल प्रतिक्षेत
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha