एक्स्प्लोर

बॉलिवूडकर कोरोनाच्या विळख्यात? आणखी दोघींना संसर्गाची लागण, इतर सेलिब्रेटींचे अहवाल प्रतिक्षेत

Bollywood Stars are Corona Positive : अभिनेत्री करीना कपूर हजर असलेल्या पार्टीतील आणखी दोघींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

Bollywood Stars are Corona Positive :  बॉलिवूड सेलिब्रेटी कोरोनाच्या विळख्यात अडकण्याची भीती निर्माण झाली आहे. अभिनेत्री करीना कपूर आणि अमृता अरोरा यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली होती. अभिनेत्री करीना कपूर आणि अमृता अरोरा या दोघी उपस्थित असलेल्या पार्टीतील इतरांना कोविडची लागण झाली आहे. सोहेल खानची पत्नी सीमा आणि संजय कपूरची पत्नी महिप खान यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. निर्माता-दिग्दर्शक करण जोहर यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर,  मलायका अरोरा, अभिनेत्री आलिया भट यांचे कोविड चाचणीचे अहवाल अद्याप आले नाहीत. 

एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेला सातत्याने कोविड १९ संसर्ग होऊ नये यासाठी कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करण्यासाठी आवाहन करत आहेत. तर, दुसऱ्या बाजूला महापालिका, आरोग्य कर्मचारी संसर्ग रोखण्यासाठी रात्रदिवस प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांच्या मेहनतीवर बेजबाबदारपणे वागणारे नागरीक पाणी फेरत असल्याचे दिसत आहे. 

सुपरस्टार सेलिब्रेटींकडून कोविड १९ प्रतिबंधात्मक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करत पार्टी लाईफ सुरू आहे. त्याचा परीणाम आता दिसू लागला आहे. कोरोनाबाधित आढळेली अभिनेत्री करीना कपूर आणि अमृता अरोरा यांनी मागील काही दिवसांमध्ये अनेक पार्टीमध्ये हजेरी लावली आहे. त्यामुळे या दोन अभिनेत्री सुपर स्प्रेडर ठरण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेने या दोघींच्या संपर्कात आलेल्यांची आणि पार्टीत उपस्थित असलेल्यांची कोरोना चाचणी करण्यास सुरुवात केली आहे. 

अभिनेत्री करिष्मा कपूर, मलायका अरोरा, आलिया भट यांचा कोरोना चाचणी अहवाल आज येण्याची शक्यता आहे. 

मुंबई महापालिकेकडून करीना कपूरची इमारत सील

अभिनेत्री करीना कपूर राहात असलेली सद्गुरु शरण बिल्डिंग करीना कपूर पॉझिटीव्ह आल्यानंतर सील करण्यात आली आहे. दिग्दर्शक करण जोहर राहत असलेली इमातरदेखील सील करण्यात आली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Dhurandhar 2 OTT Verdict: 'धुरंधर 2' भारतीय सिनेमांचा नवा बादशाह; थेट राजामौलींच्या RRR ला दिली मात; रेकॉर्डब्रेक घोडदौड सुरूच
'धुरंधर 2' भारतीय सिनेमांचा नवा बादशाह; थेट राजामौलींच्या RRR ला दिली मात; रेकॉर्डब्रेक घोडदौड सुरूच
Sejal Pawar Controversy: सेजलची चौकशी होणार, 5 सदस्यीय समिती स्थापन; प्रणित मोरेच्या शोमधील 'टॉक' डॉक्टर युवतीच्या अंगलट
सेजलची चौकशी होणार, 5 सदस्यीय समिती स्थापन; प्रणित मोरेच्या शोमधील 'टॉक' डॉक्टर युवतीच्या अंगलट
Gulabi Saadi: 'गुलाबी साडी' सुपरहिट ठरलं, पण मानधन.., प्राजक्ता घागनं सांगितला खास किस्सा
'गुलाबी साडी' सुपरहिट ठरलं, पण मानधन.., प्राजक्ता घागनं सांगितला खास किस्सा
Prem Bhati Death: वडिलांना सांगितलं 10 मिनिटांत येतो, पण नियतीच्या मनात...पत्नीला माहेरी सोडून परतल्यानंतर प्रसिद्ध इन्फ्लुएंसरचा अपघाती मृत्यू
वडिलांना सांगितलं 10 मिनिटांत येतो, पण नियतीच्या मनात...पत्नीला माहेरी सोडून परतल्यानंतर प्रसिद्ध इन्फ्लुएंसरचा अपघाती मृत्यू

व्हिडीओ

Tandulwadi Accident Savior : तांदूळवाडीतील अपघात कसा घडला? 'देवदूत' इरफानने पाच जणांचा जीव वाचवला!
Tukaram Mundhe Special Report:तुकाराम मुंढेंच्या कारवाईच्या धास्तीने परळीतील पानटपऱ्यांची शटर्स डाऊन
Shiv Sena UBT Operational Friction: उबाठाचे तेच पाच खासदार, उद्धव ठाकरेंच्या बैठकीला अनुपस्थिती, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
Sanjay Raut PC : धारावी ताब्यात घेण्यासाठी अदानींनी पाकिस्तानातून गुंड आणलेत, राऊतांचे आरोप
Mountaineer Umesh Zirpe On Majha Katta : यावेळीची मोहीम कशी होती? झिरपेंनी सांगितला थरारक अनुभव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ममता बॅनर्जींच्या फुटीर 20 खासदारांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेला, पण मान्यता नसलेला त्रिपुरातला पक्ष निवडला, पण भाजपला पाठिंबा दिला, पक्ष आणि चिन्हावर सुद्धा दावा करणार
ममता बॅनर्जींच्या फुटीर 20 खासदारांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेला, पण मान्यता नसलेला त्रिपुरातला पक्ष निवडला, पण भाजपला पाठिंबा दिला, पक्ष आणि चिन्हावर सुद्धा दावा करणार
Maharashtra Live blog updates: मान्सून लांबल्याने शेतकरी चिंतेत, पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या
Maharashtra Live blog updates: मान्सून लांबल्याने शेतकरी चिंतेत, पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या
Iran War Live Update: भारतासकट जगाला दिलासा मिळणार? अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करारात काय काय ठरलं? पहिल्यांदाच माहिती समोर!
भारतासकट जगाला दिलासा मिळणार? अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करारात काय काय ठरलं? पहिल्यांदाच माहिती समोर!
Solapur Accident: खुदा का फरिश्ता... चिमुकल्याला बुडताना पाहून थेट विहिरीत उडी; देवदूत इरफानने 5 जणांचा जीव वाचवला
Video: खुदा का फरिश्ता... चिमुकल्याला बुडताना पाहून थेट विहिरीत उडी; देवदूत इरफानने 5 जणांचा जीव वाचवला
मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या स्वागताला, देवेंद्र फडणवीस अन् सुनेत्रा पवारांची 'शाळा' ठरली; एकनाथ शिंदेंनी सायकल वाटल्या
मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या स्वागताला, देवेंद्र फडणवीस अन् सुनेत्रा पवारांची 'शाळा' ठरली; एकनाथ शिंदेंनी सायकल वाटल्या
BLOG: दुष्काळाची व्हायरल चर्चा आणि जांभूळ आख्यान, महाभारताच्या काळातलं फळ
BLOG: दुष्काळाची व्हायरल चर्चा आणि जांभूळ आख्यान, महाभारताच्या काळातलं फळ
Morena Train Accident: इंटरसिटी एक्स्प्रेसला आग लागल्याची खोटी अफवा पसरली, प्रवासी ट्रॅकवर उतरले अन् विरुद्ध दिशेनं येणाऱ्या दुसऱ्या एक्स्प्रेसनं चार जणांना चिरडलं
इंटरसिटी एक्स्प्रेसला आग लागल्याची खोटी अफवा पसरली, प्रवासी ट्रॅकवर उतरले अन् विरुद्ध दिशेनं येणाऱ्या दुसऱ्या एक्स्प्रेसनं चार जणांना चिरडलं
Malshiras Pickup Accident : माळशिरसमध्ये पिकअप विहिरीत कोसळून 8 जणांचा मृत्यू, रस्ता सुरक्षा उपाय योजना नाहीत, बैठका होतात पण कंत्राटदारांवर कारवाई होत नाही, धैर्यशील मोहिते पाटील यांचं वक्तव्य
माळशिरसमध्ये भीषण अपघात, धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, चार चार वर्ष कामं अपूर्ण, पत्रव्यवहार केला तरी दखल घेत नाहीत...
Embed widget